Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर पुन्हा अपघात, पाच वाहनांच्या धडकेत घरडा कंपनीचे 20 कामगार जखमी

Mumbai Goa Highway: परशुराम घाटात काही दिवसांपूर्वी संरक्षक भिंत कोसळली होती. त्यानंतर सुरु करण्यात आलेल्या एकेरी वाहतूक भागात हा अपघात झाला.
Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर पुन्हा अपघात, पाच वाहनांच्या धडकेत घरडा कंपनीचे 20 कामगार जखमी
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Accident

मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच असून, खेड चिपळूणच्या परशुराम घाटात पाच वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. यात घरडा कंपनीचे वीस कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने कामगारांच्या बसला धडक दिल्याने मंगळवारी (०३ डिसेंबर) दुपारी हा अपघात झाला.

गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर घरडा कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला धडकला. यामुळे बस रस्त्यावरील गर्डवर जाऊन आदळली. कंटेनरच्या मागे येणारा आयशर ट्रक कंटेनरवर पलटी झाला तर, बसच्या मागील कार व इतर वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात घरडा कंपनीचे १५ ते २० कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. (Mumbai Goa Highway)

Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर पुन्हा अपघात, पाच वाहनांच्या धडकेत घरडा कंपनीचे 20 कामगार जखमी
मनोहर पर्रीकरांच्या मुलाने मुंबईत घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट, 'महा'विजयासाठी दिल्या शुभेच्छा

परशुराम घाटात (Parshuram Ghat, Chiplun, Khed) काही दिवसांपूर्वी संरक्षक भिंत कोसळली होती. त्यानंतर या भागात एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. एकेरी वाहतूक सुरु करण्यात आलेल्या भागातच हा अपघात झाला. समोरुन आलेला कंटेनर थेट बसवर आदळल्याने बसच्या मागील वाहने एकमेकांवर आदळली.

जखमी कामगारांवर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. चिपळूण वाहतूक पोलिसांनी (Chiplun Traffic Police) घटनास्थळी धाव घेत तीन तास खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com