Omkar Elephant Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: ..नंतर कायदा हातात घेतला तर दोष देऊ नका! उगवेवासीयांचा इशारा; 'ओंकार'चा बंदोबस्त करण्याची केली मागणी

Omkar Elephant Goa: ओंकार हत्तीने सध्या उगवे-कासुले परिसरात आपले बस्तान मांडले असून कवाथे, केळी यांची नासधूस करत असतानाच लोकवस्तीत येऊन लाल व पांढऱ्या रंगाच्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: ओंकार हत्तीने सध्या उगवे-कासुले परिसरात आपले बस्तान मांडले असून कवाथे, केळी यांची नासधूस करत असतानाच लोकवस्तीत येऊन लाल व पांढऱ्या रंगाच्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

या वाहनांची मोडतोड करायला सुरवात केल्यामुळे स्थानिक भयभीत झाले आहेत. रात्री ९-१० वा.नंतर ओमकार हत्ती लोकवस्तीत प्रवेश करून स्थानिकांची झोपमोड करत आहे. तो हत्ती जातो कुठे, काय करतो, याच्यावर फक्त वन खात्याचे कर्मचारी पाळत ठेवण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत.

यामुळे त्रस्त झालेल्या उगवेवासीयांनी सरकारला इशारा देताना सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कायदा हातात घेतला तर स्थानिकांना दोष देऊ नका. त्याअगोदर या ओंकार हत्तीचा बंदोबस्त करा, अशी मागणी केलेली आहे.

ओंकार हत्तीने उगवे परिसरात कवाथे-केळी खाण्याबरोबरच तीन-चार चारचाकी वाहनांचे नुकसान केले होते. गुरुवारी रात्री कासुले-उगवे परिसरात एका चारचाकी वाहनाचे नुकसान केले.

आज इकडे, उद्या तिकडे

एक दिवस निगळे-पोरस्कडे परिसरात ओंकार हत्ती येतो. त्यानंतर लगेच कासुले मार्गे उगवे परिसरात येऊन नुकसानी करत आहे. त्यामुळे आणखी विलंब न लावता सरकारने या ओंकार हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच सुबोध महाले यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT