Omkar Elephant: 'ओंकार'ची नजर आता वाहनांवर, उगवे येथे लोकवस्तीत घुसून नुकसान करण्यास सुरुवात

Omkar Elephant In Goa: ओंकार हत्तीने सध्या उगवे-कासुले परिसरात आपले बस्तान मांडले असून कवाधे, केळी यांची नासधूस करत आहे.
Omkar Elephant
Omkar ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: ओंकार हत्तीने सध्या उगवे-कासुले परिसरात आपले बस्तान मांडले असून कवाधे, केळी यांची नासधूस करत असतानाच लोकवस्तीत येऊन लाल व पांढऱ्या रंगाच्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

या वाहनांची मोडतोड करायला सुरवात केल्यामुळे स्थानिक भयभीत झाले आहेत. रात्री ९-१० वा. नंतर ओमकार हत्ती लोकवस्तीत प्रवेश करून स्थानिकांची झोपमोड करत आहे.

तो हत्ती जातो कुठे, काय करतो, याच्यावर फक्त वन खात्याचे कर्मचारी पाळत ठेवण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत, यामुळे त्रस्त झालेल्या उगवेवासीयांनी सरकारला इशारा देताना सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कायदा हातात घेतला तर स्थानिकांना दोष देऊ नका. त्याअगोदर या ओंकार हत्तीचा बंदोबस्त करा, अशी मागणी केलेली आहे.

Omkar Elephant
Goa Politics: काँग्रेसचे 'वरिष्ठ' नेते येणार गोव्यात! गोवा फॉरवर्डची यादीही रखडली; भाजपचा 7 अपक्षांना पाठिंबा

ओंकार हत्तीने मागच्या चार दिवसांपूर्वी उगवे परिसरात येऊन कवाचे केळी खाण्याबरोबरच तीन-चार चारचाकी वाहनांचे नुकसान केले होते. गुरुवारी रात्री कासुले उगवे परिसरात या हत्तीने एका चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले..

Omkar Elephant
Goa ZP Election 2025: जि.पं. निवडणुकीसाठी काँग्रेसची 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सामाजिक समीकरण साधत 'वादग्रस्त' सांताक्रूझ जागेवर केला दावा

आज इकडे, उद्या तिकडे एक दिवस निगळे-पौरस्कडे परिसरात ओंकार हत्ती येतो. त्यानंतर लगेच कासुले मार्गे उगवे परिसरात येऊन नुकसानी करत आहे.

त्यामुळे आणली विलंब न लावता सरकारने या ऑकार हत्तीचा फायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच सुबोध महाले यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com