Closed Old Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

Old Mandovi Bridge Closed: वाहनचालकांची डोकेदुखी वाढली; जुना मांडवी पूल 15 दिवस बंद, पर्यायी मार्ग काय?

Old Mandovi Bridge: १५ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवस नव्या मांडवी पुलाचा प्रवाशांना वापर करावा लागणार आहे.

Pramod Yadav

Goa Old Mandovi Bridge Closed

पणजी: राजधानीतून पर्वरीत किंवा पुढे म्हापसाला जाण्यासाठी महत्वाचा असणारा जुना मांडवी पूल आजपासून (१५ फेब्रुवारी) पंधरा दिवस बंद राहणार आहे. उत्तर गोवा वाहतूक विभागाच्या वतीने याबाबत माहिती दिली आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त पूल बंद ठेवला जाणार असल्याचे वाहतूक खात्याने म्हटले आहे. दरम्यान, यामुळे नव्या मांडवी पुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालीय.

जुना मांडवी पूल का बंद करण्यात आला?

उत्तर गोवा वाहतूक खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पणजी आणि पर्वरीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील जुना मांडवी पूल दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद ठेवण्याचा निर्णय बांधकाम खात्याने घेतला आहे. याकाळात जुना पुलावरील वाहतूक नवीन मांडवी पुलावर वळविण्यात आली आहे. नागरिकांना या वाहतूक बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, अशी सूचना खात्याने केली आहे.

पर्यायी मार्ग काय?

वाहतूक बंदची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली असून, पणजी बसस्थानकाजवळून मांडवी पुलावर जाणारा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. प्रवाशांना नव्या मांडवी पुलावर जाण्यासाठी पणजी बस स्थानकावरील सर्कलला वळसा घालून अटल पूलाच्या खालून नव्या पुलावर जावे लागणार आहे. १५ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवस याच मार्गाचा प्रवाशांना वापर करावा लागणार आहे.

नव्या मांडवी पुलावर वाहतूक कोंडी

जुन्या पुलावरील वाहतूक नव्या मांडवी पुलावर स्थलांतरीत करण्यात आल्याने नव्या पुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पणजीत स्मार्ट सिटीच्या कामासाठी आधीच पाच मार्ग बंद असल्याने प्रवशांना नाहक त्रास सहन करावा लागत असताना, आता यात आणखी भर पडली आहे.

यापूर्वीही पूल केला होता बंद

जुना मांडवी पूल यापूर्वी देखील दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद करण्यात आला होता. पर्वरी आणि रेईश मागुशला जाण्यासाठी हा पूल महत्वाचा मानला जातो. शिवाय अटल पुलावरुन दुचाकीला बंदी असल्याने दुचाकी चालकांसाठी जुन्या आणि नव्या पुलाची मोठी मदत होत असते. दरम्यान, आता जुना पूल १५ दिवस बंद राहणार असल्याने तोपर्यंत नव्याच पुलाचा प्रवाशांना वापर करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT