USA Deportation: बेकायदेशीर स्थलांतराचा मुद्दा! अमेरिकेतून दोन गोमंतकीय परतणार; आयुक्तालयाकडे नाही उत्तर

Goan Passangers deportation USA: अमेरिकेतील भारतीयांना परत पाठविण्याच्या प्रक्रियेत उद्या, १५ रोजी अमृतसर येथे उतरणाऱ्या विमानात गोव्याच्या दोघांचा समावेश आहे.
Goan Passangers deportation USA
Goan Residents USA DeportationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अमेरिकेतील भारतीयांना परत पाठविण्याच्या प्रक्रियेत उद्या, १५ रोजी अमृतसर येथे उतरणाऱ्या विमानात गोव्याच्या दोघांचा समावेश आहे. मात्र, ते कोण, याची माहिती एनआरआय आयुक्तालयाकडे नाही. आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी याबाबत कोणतीही माहिती नाही, असे त्रोटक उत्तर दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण ११९ भारतीय स्थलांतरित असतील. यापैकी ६७ पंजाबचे, ३३ हरियाणा, ८ गुजरात, ३ उत्तर प्रदेश, २ राजस्थान, २ महाराष्ट्र, २ गोवा आणि प्रत्येकी एक हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचे आहेत.

अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठविण्याची ही प्रक्रिया यापूर्वीही झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी अमेरिकन लष्कराच्या सी-१७ विमानाद्वारे १०४ भारतीय स्थलांतरितांना अमृतसर येथे आणले होते. त्यापैकी ३० पंजाबचे, ३३ हरियाणा, ३३ गुजरात, ३ महाराष्ट्र, ३ उत्तर प्रदेश आणि २ चंदीगडचे होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर कारवाई करत, त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याची प्रक्रिया वेगाने राबविली आहे. या धोरणांतर्गत अमेरिकेने भारतासह इतर देशांतील बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी लष्करी विमानांचा वापर केला आहे.

अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या परताव्याबाबत भारत आणि अमेरिकेच्या सरकारांमध्ये चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानवी तस्करीविरुद्ध लढा देण्याची गरज व्यक्त केली आहे.

Goan Passangers deportation USA
Goa Politics: ‘USA’त भारतीयांचा सन्मान राखण्यात सरकार अपयशी, अमित पाटकरांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदी यांनी असेही म्हटले आहे की, बेकायदेशीरपणे दुसऱ्या देशात प्रवेश करून राहणाऱ्यांना त्या देशात राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या गोमंतकीयांनी घाबरण्याची गरज नाही. जर नव्या धोरणांमुळे भारतीय नागरिकांना अडचणी आल्या तर त्यांच्या कायदेशीर परतीसाठी केंद्र सरकार तयार आहे, असेही ते म्हणाले होते.

Goan Passangers deportation USA
Goa Politics: खरी कुजबुज, तुरुंगात ‘जॅमर’ चा प्रस्ताव अन् मलई

आपल्याकडे माहिती नाही!

‘‘जोपर्यंत कोणतीही तक्रार किंवा विनंती आम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आयोग काहीही सांगू शकत नाही. मात्र, अमेरिकेत ट्रम्प सरकारच्या निर्णयानंतर गोमंतकीयांना काही समस्या उदभवल्यास आम्ही मदत करण्यास तयार आहोत’’, असे सावईकर याआधी म्हणाले होते. आज मात्र त्यांनी आपल्याकडे माहिती नाही, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com