Goa Covid-19 Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: कोरोना रुग्णांत घट; राज्यात 72 टक्के लसीकरण

गोव्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 597 असून मडकई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (gOA) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या (Covid-19 patients ) मृत्यूची संख्या 4 वरून खाली येत नव्हती. मात्र, आज एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने सरकारी यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. नव्याने नोंद झालेल्या कोरोना बाधितांची संख्याही पहिल्यांदाच 50 पेक्षा कमी आहे.

राज्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 597 असून मडकई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. गेल्या 24 तासांत 4,997 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात 47 नवे रुग्ण सापडले. त्यापैकी 6 जणांना इस्पितळात दाखल केले असून 41 जण गृह विलगीकरणात आहे.

गृह विलगीकरणातील 70 रुग्ण बरे झाले आहेत तर 6 जण इस्पितळातून बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कोरोना रुग्ण नोंदीपेक्षा अधिक आहे. काल दिवसभरात 845 जणांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला, तर 5,557 जणांनी दुसरा डोस घेतला. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण चांगले आहे. आतापर्यंत 8 लाख 37 हजार 947 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत, तर एक डोस घेतलेल्यांची संख्या 3 लाख 91 हजार 033 आहे.

राज्यात 72 टक्के लसीकरण

राज्यात लसीकरणासाठी लोक पुढे येत असून दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 72 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT