गोवा सरकारकडून कॉंग्रेसचा मशाल मोर्चा चिरडण्याचा प्रकार

काँग्रेसच्या मशाल मोर्चावर गोवा पोलिसांचा बेछूट लाठीमार, महिलांवरही आसूड, गोवा पोलिसांवर दंडेलशाहीचा आरोप
गोवा काँग्रेसच्या मशाल मोर्चावर गोवा पोलिसांचा बेछूट लाठीमार
गोवा काँग्रेसच्या मशाल मोर्चावर गोवा पोलिसांचा बेछूट लाठीमारDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सध्याचे सरकार (Goa Government) हे काळोखात आहे. त्याला अंधारातून प्रकाशात नेण्यासाठी काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी मशाल मोर्चा काढला. मात्र, हे आंदोलन पोलिसांनी लाठीमार करून उधळून लावले. कोणताही आदेश नसताना पोलिसांनी (Goa Police) महिलांवर लाठीमार केला, असा आरोप करीत काँग्रेसने सरकारचा निषेध केला. मशाल मोर्चामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यालाही काँग्रेसने पोलिसांनाच जबाबदार धरले.

गेले दोन दिवस विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. या काळात विरोधकांच्या प्रश्‍नांना सरकारने तिलांजली वाहिल्याची भावना विरोधक कॉंग्रेस नेत्यांमध्ये आहे. विविध प्रश्‍नांना सरकार बगल देत असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी काँग्रेस भवनपासून सायंकाळी मशाल मोर्चाला सुरवात केली. मात्र, या मोर्चाला रितसर परवानगी घेतली नसल्याच्या कारणावरून मांडवी हॉटेलसमोर हा मोर्चा रोखण्यात आला. तरीही जोरजबरदस्तीने कार्यकर्त्यांनी मशाल मोर्चाला सायंकाळी सातच्या सुमारास सुरवात केली. काही काळ मोर्चा शांततेत चालला असताना येथील विनंती हॉटेलजवळ काही कार्यकर्त्यांनी आगळीक केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्‍यावर बेछूट लाठीमार केला. यावेळी कार्यकर्त्यांची पळताभुई थोडी झाली.

गोवा काँग्रेसच्या मशाल मोर्चावर गोवा पोलिसांचा बेछूट लाठीमार
महाराष्ट्रातील नोकरदारांवर संकट, चोर समजून गोव्यात बदडले

घटनास्थळी एकच झुंबड उडाली होती. त्यात अनेकजण जखमी झाले. सरकारकडून कॉंग्रेसचा मशाल मोर्चा चिरडण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत असताना पोलिसांनी मात्र कॉंग्रेसने मोर्चासाठी परवानगी घेतली नव्हती. त्‍यातही कार्यकर्त्यांची आगळीक चालली होती. त्‍यामुळे सौम्य लाठीमार करावा लागल्याचा खुलासा केला.

जेवढे कार्यकर्ते, तेवढेच पोलीस

परवानगी नसतानाही काढलेल्या मशाल मोर्चात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, तेवढेच पोलिसदेखील बंदोबस्तासाठी होते. त्यामुळे सुरवातीला जेव्हा मशाल मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा घटनास्थळी दोन्ही गटांमध्‍ये बराच वेळ तू तू-मै मै सुरू होती.

अभूतपूर्व वाहतूक कोंडी

कॉंग्रेसच्या या मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात विशेषतः हिंदी भाषिक आणि महिलांची संख्या मोठी होती. परिणामी, हे कार्यकर्ते दयानंद बांदोडकर मार्गावर आल्यानंतर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सोडवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. तासभर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासांचे हाल झाले.

...तर त्या कॅसिनोतही घुसणार

शहरातील एका कॅसिनोत विश्व पोकर स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे तेथे शेकडो लोकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कोविडचा प्रसार होत नाही असा प्रश्‍न कॉंग्रेसने यावेळी उपस्थित केले. ‘त्या’ कॅसिनोतील कार्यक्रम बंद न झाल्यास आज गुरुवारी कॅसिनोत घुसू, असा सज्‍जड इशारा कॉंग्रेसने दिला आहे.

गोवा काँग्रेसच्या मशाल मोर्चावर गोवा पोलिसांचा बेछूट लाठीमार
कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

सरकारच्याच चिथावणीमुळे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी निर्दयी लाठीमार केला. ही जुलूमशाही अधिकच वाढली आहे.

- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

आम्ही रस्त्यावर एका बाजूने वाहतुकीला अडचण न करता चालत होतो. पण पोलिसांच्या उद्दामपणामुळे वाहतूक खोळंबत होती. आमच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अकारण लाठीमार कला.

- संकल्प आमोणकर, उपाध्यक्ष, कॉंग्रेस.

पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार

गोमंतकीयांच्या गणेश चतुर्थीसारख्या महत्त्वाच्या सणावर बंदी घालण्यात आली. देवांचे उत्सव मर्यादित करण्यात आले. सगळे नियम आमच्यासाठीच का? आता कोरोनाची तिसरी लाट येणार नाही का? कॅसिनोंवर पोलिस कारवाई का करीत नाही? असा प्रश्नांचा भडिमार पोलिस निरीक्षक सुदेश नाईक, निनाद देऊलकर आणि पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्यावर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com