फातोर्डा: दक्षिण गोवा जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक हल्लीच जिल्हाधिकारी कचेरीत संपन्न झाली. या बैठकीत तंबाखू सेवन नियंत्रणासाठी आणण्यासाठी उपाययोजनांवर विचार व चर्चा करण्यात आली. दक्षिण गोव्यात सिगरेट व इतर तंबाखू उत्पादनांचा लोक किती प्रमाणात सेवन करतात व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरीय अंमलबजावणी गट काय करतात व त्यानी काय करावे यावर विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक (Surendra Naik) होते. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन, पंचायत, शिक्षण (Education) व पर्यटन (Tourism) संचालनालयांनी काय पावले उचलली आहेत याची माहिती जिल्हाधिकारी नाईक यानी दिली.
DLCC चे सदस्य सचिव डॉ. सारा जॉर्ज यानी सांगितले की तंबाखू निर्मुलन मोफत शैक्षणिक संस्थाना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. हे प्रशिक्षित लोक शाळांमध्ये जाऊन तंबाखू निर्मुलना संबंधी जागृती करणार आहेत. नगरपालिकांतील नव्याने निवडुन आलेल्या नगरसेवकांनाही या संदर्भात प्रशिक्षण दिले जाईल.
गोवकॅनचे संयोजक रोलांड मार्टिन्स यानी सांगितले की गुटखावर जाहीर बंदी असुनही गुटखा सर्वत्र उपलब्ध आहे. गुन्हा शाखा व कोकणी रेल्वे पोलिसांनी तंबाखू, गुटखा उत्पादने किती जप्त केली आहे व काय कारवाई केली आहे याची माहिती देण्याची मागणी केली.
दक्षिण गोव्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर कोतपा (COTPA) नियमन 4 खाली सर्व खबरदारी घेण्याचे आदेश दिले जातील असे मडगाव रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक प्रशांत गाड यानी सांगितले. स्वाती दळवी, पंचायत खात्याच्या उपसंचालिका हिने सांगितले की BDO द्वारे जिल्ह्यातील सर्व पंचायतीमध्ये ACT - 6 A खाली पुनरावलोकन केले जाईल असे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.