Goa News | Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: चांदर-कुडतरी पूल जानेवारी अखेरीस वाहतुकीस खुला

नीलेश काब्राल : अजूनही रस्त्याचे हॉटमिक्सिंग बाकी आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सोमवारी (ता.2) सकाळी चांदर-कुडतरी पुलाची पाहणी केली. हा पूल जानेवारीच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. पूल वाहतुकीस खुला करण्यापूर्वी पुलासाठी जी जागा संपादित केली आहे त्या ठिकाणी केलेले अतिक्रमण हटवून ती जागा मोकळी केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

पुलाजवळील जागा जी पुलावर जाण्यासाठी रस्ता करण्यास संपादित केली होती तिचा पूर्णपणे खात्याने उपयोग केलेला नाही. हा पूल गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये वाहतुकीस खुला करण्यास येईल, असे जाहीर करण्यात आले होते.

नंतर उद्‌घाटन सोहळा मे 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर मडगावहून चांदरला जायला अवघी 20 मिनिटे लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हा पूल जेव्हा प्रस्तावित केला होता तेव्हा चांदर व गिरदोलीच्या नागरिकांनी त्यास कडाडून विरोध केला होता. पूल रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणासाठी बांधण्यात येत आहे, अशी नागरिकांना भीती होती. तसेच हा पूल 12 ऐवजी केवळ 6 मीटर रुंदीचा असावा, अशीही त्यांची मागणी होती. या पुलाचे बांधकाम केंद्र व राज्य सरकारतर्फे तसेच दक्षिण-पश्र्चिम रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

या पुलावरील रस्त्याचे हॉटमिक्सिंग अजून केलेले नाही. हे काम एप्रिल-मे महिन्यात केले जाईल; पण सर्व प्रकारची सावधानता बाळगून पूल वाहतुकीस खुला केला जाईल.- नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT