Ashwem Beach: बदलते वातावरण सागरी कासवांना मारक

बदलत्या वातावरणाचा परिणाम ऑलिव्‍ह रिडले अर्थात सागरी कासवांवर झाला आहे.
Turtle Center
Turtle CenterDainik Gomantak
Published on
Updated on

Ashwem Beach: बदलत्या वातावरणाचा परिणाम ऑलिव्‍ह रिडले अर्थात सागरी कासवांवर झाला आहे. एरवी नोव्हेंबर महिन्यात कासवांचे आगमन व्‍हायचे. मात्र यावेळी दोन महिने उशिराने म्‍हणजे 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कासव आश्‍‍वे किनाऱ्यावर प्रकटले आणि त्‍याने अंडीही घातली. अंडी घातलेला परिसर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित केला.

सागरी कासवाने आश्‍‍वे येथील शांत परिसर असलेल्या किनारी भागात अंडी घातल्याची माहिती तेथील सुरक्षा रक्षकाने वन विभागाला दिल्यानंतर त्‍यांनी अंडी घातलेला परिसर जाळी मारून सुरक्षित केला. कासवसंवर्धन मोहीम 1997 पासून तेंबवाडा-मोरजी परिसरात राबवली जात आहे.

त्यामुळे सागरी कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी वन खाते व ग्रामस्‍थांना यश आले आहे. तेंबवाडा येथील पाचशे चौरस मीटर जमीन ही सागरी कासवांच्या अंड्यांच्या सुरक्षेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरक्षित केली होती. त्याच ठिकाणी हंगामी स्वरूपाचे अभ्यास केंद्र म्हणून वन विभागाने झोपडी उभारलेली आहे.

Turtle Center
Siolim: वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शिवोलीकर त्रस्त

मोरजी आणि मांद्रे हा संवेदनशील किनारा म्हणून जाहीर करण्यात आला होता. परंतु २०२२ नंतर शेवटच्या आठवड्यात हा किनारा ‘कमर्शियल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे आणि तशा प्रकारचे परिपत्रक सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेले आहे.

आश्‍‍वे-मांद्रे येथे ज्या परिसरात सागरी कासवाने अंडी घातलेली आहेत, त्या परिसरात कसल्याच प्रकारचे कमर्शियल बांधकाम काँक्रीटीकरण झालेले नाही. त्या ठिकाणी जो नैसर्गिक किनारा व परिसरातील ज्या पद्धतीने पूर्वीची झाडे आहेत तशाच पद्धतीचा परिसर पर्यावरणप्रेमी डेंझिल सिक्वेरा यांनी त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

सागरी कासव अंडी घालतात तो भाग सुरक्षित ठेवण्याबरोबरच या परिसरात विकास निर्बंध घातले जातील आणि तशा प्रकारचे प्रयत्न आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याचे वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी जाहीर केले आहे. आश्वे आणि मांद्रे परिसरात काही ठिकाणी सीआरझेड नियमाचा भंग करून अनेक बांधकामे उभारण्‍यात आलेली आहेत.

काही ठिकाणी सरकारी जागेत अतिक्रमण करून ‘किनारा जणू आपलाच आहे’ अशा भ्रमात लोक वावरत आहेत. या भागाला निदान एकदा तरी वनमंत्री राणे यांनी प्रत्‍यक्ष भेट देऊन आपल्या उघड्या डोळ्यांनी ही बांधकामे पाहावीत आणि त्‍यांच्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com