babush monserrate On Cash For Job Scam Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा चोरबाजार! 'त्या' ऑडिओतील मोन्सेरात कोण? महसूलमंत्री संतापले, सखोल चौकशीची केली मागणी

Goa Cash For Job Scam: ध्वनिफितीमध्ये 'मोन्सेरात' नामक उल्लेख झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री व्यथित झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नोकरी प्रकरणातील एका ध्वनिफितीमध्ये 'मोन्सेरात' हे नाव आल्याने संतप्त झालेल्या महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे केली आहे.

'जॉब स्कॅम'ला पुष्टी देणारी आमदार गणेश गावकर यांच्या आवाजातील एक कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागताच माहिती हक्क कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी कुळे पोलिसांत तक्रार केली. ही ध्वनिफीत ताम्हणकर यांच्याकडे कशी पोचली, याची चौकशी करण्याची मागणी गावकर यांनी केली आहे.

त्या ध्वनिफितीमध्ये 'मोन्सेरात' नामक उल्लेख झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री व्यथित झाले आहेत. मोन्सेरात यांनी पैशांच्या बदल्यात सरकारी नोकऱ्या देण्याच्या आरोपांबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे लक्ष वेधले आहे.

सरकारी खात्यांत नोकऱ्या मिळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अशा आरोपांमुळे सरकार आणि पक्षाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने तातडीने योग्य ती पावले उचलली जावीत.
बाबूश मोन्सेरात, महसूलमंत्री

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

२१ ऑक्टोबरपासून नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याअन्वये आतापर्यंत २३ जणांना अटक झाली आहे. रोज त्यात भर पडत आहे. लोकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.

संशयित हे राजकीय पक्षांशी संबंधित असल्याचे आरोप होत असतानाच सत्तेतील मंत्री मोन्सेरात यांनीच चौकशीची मागणी केल्याने सरकार कोणती भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT