Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला? पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली

Jonty Rhodes Shares Views About Experience in Goa: भारताच्या प्रेमापोटी त्याने त्याच्या मुलाचे नाव देखील इंडिया असे ठेवले आहे.
Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला?  पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली
Jonty RhodesDainik Gomantak
Published on
Updated on

Jonty Rhodes Views About Goa

पणजी: गोव्याच्या पर्यटनावरुन सध्या सोशल मिडियावर टीकासत्र सुरु आहे. कोरोनानंतर गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी एकाने शेअर केली. यानंतर गोवा पर्यटनाबाबत अनेकांनी नकारात्मक अनुभव सोशल मिडियावर शेअर केले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने गोव्याबाबत मत व्यक्त केले आहे.

जॉन्टी ऱ्होड्स गेल्या काही दिवसांपासून पत्नी, मुलांसोबत गोव्यात राहत आहे. जॉन्टी गोव्यातील अनेक व्हिडिओ फोटो त्यांच्या Instagram Handle वर शेअर करत असतो. अलिकडे जॉन्टीने त्याच्या एक्स हँडलवर फॉलोवर्ससोबत Q/A घेतला. यात त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले.

जॉन्टीला तू गोव्यात सेटल झाला आहेस का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने मी दरवर्षी कुटुंबासमवेत पाच महिने गोव्यात असतो, असे उत्तर दिले.

राहण्यासाठी गोवाच का निवडला? असा विचारलेल्या प्रश्नाला जॉन्टीने फार चांगले उत्तर दिले. दक्षिण गोव्यात असणारे लहान गाव. स्वच्छ समुद्रकिनारे, आणि प्रेमळ लोक. जवळच जंगलात असणारी एक लहान शाळा आणि भारतात काम करण्यासाठी मला सुलभ होणारा प्रवास, यामुळे गोव्यात राहण्याचा पर्याय निवडला असे जॉन्टी म्हणाला.

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला?  पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली
Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

अनेक भारतीय गोव्याबाबत तक्रार करतायेत, तुमचा काय अनुभव आहे? असा प्रश्न दुसऱ्या एका युझरने विचारला. यावर तुम्ही तक्रार करु शकता किंवा त्यात उत्तम शोधू शकता मी दुसरा पर्याय निवडला, असे उत्तर जॉन्टीने दिले.

"माझ्या फॅमिलीसाठी दक्षिण गोव्यातील शांत आयुष्य छान आहे. माझी दोन्ही मुले समुद्रकिनारी जाऊन आमच्या मदतीशिवाय सर्फ करु शकतात. येथील समुदाय त्यांच्यावर लक्ष ठेवतो. माझा मुलगा इंडिया गेल्या पाच आठवड्यात खूप समजुतदार झाला आहे", अशी पोस्ट जॉन्टीने केली आहे.

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला?  पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली
Birsa Munda Jayanti 2024: गोमंतकात ‘धरती अबा’चा पुतळा हवाच, तोही भव्य दिव्य...

जॉन्टी ऱ्होड्स दरवर्षी पाच महिने गोव्यात राहतो. गोव्यातच त्याने त्यांच्या मुलांना शाळेत दाखल केले आहे. भारताच्या प्रेमापोटी त्याने त्याच्या मुलाचे नाव देखील इंडिया असे ठेवले आहे. जॉन्टी गोव्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो कायम सोशल मिडियावर शेअर करत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com