Ranveer Allahbadia Ranveer Allahbadia Instagram
गोवा

Ranveer Allahbadia: नाका - तोंडात पाणी गेलं, जीव घुटमळला, अखेर IPS धावला मदतीला; रणवीर अल्लाहबादिया, त्याची गर्लफ्रेन्ड थोडक्यात बचावले

Ranveer Allahbadia Drowning: पाण्याच्या प्रवाहात दोघांचा निभाव लागला नाही. नाका - तोंडात पाणी गेले, जीव घुटमळायला लागला, असा अनुभव रणवीरने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.

Pramod Yadav

माजोर्डा: गोव्यात पर्यटनाचा हंगाम तेजीत सुरु आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यात अपघातासह विविध घटना घडत आहेत. नाताळच्या (२५ डिसेंबर) दिवशी राज्यात विविध पाच घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. तर, नाताळच्या एक दिवस अगोदर प्रसिद्ध युट्युबर आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत एक थरारक घटना घडली. आयपीएस अधिकारी मदतीला आल्यामुळे दोघेही बुडण्यापासून थोडक्यात बचावले असा अनुभव युट्युबरने शेअर केला आहे.

रणवीर अल्लाहबादिया या प्रसिद्ध युट्युबरने गोव्यात त्याच्यासोबत घडलेल्या थरराक घटनेचा अनुभव कथन केला आहे. रणवीर त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत गोव्यात सुट्टीसाठी आला आहे. माजोर्डा समुद्रकिनारी रणवीर आणि त्याची गर्लफ्रेन्ड पोहण्यासाठी गेले होते. समुद्रात पोहत असताना दोघेही पाण्याच्या जोरदार लाटेसोबत आत ओढले गेले. पाण्याच्या प्रवाहात दोघांचा निभाव लागला नाही. नाका - तोंडात पाणी गेले, जीव घुटमळायला लागला, असा अनुभव रणवीरने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे.

माजोर्डा समुद्रकिनारी बुधवारी सांयकाळी सहा वाजता ही घटना घडल्याचे रणवीरने सांगितले आहे. समुद्रात पोहण्यासाठी दोघेही गेले असता मोठ्या लाटेने ते आत फेकले गेले. पाण्यात त्यांचा जीव घुटमळायला लागला. पाण्यात त्यांचा निभाव लागत नव्हता. अखेर रणवीरने मोठ्याने मदतीसाठी आवाज दिला. यावेळी जवळच पोहत असलेल्या एक दाम्पत्य त्यांच्या मदतीला धावले, असे रणवीरने सांगितले.

Ranveer Allahbadia

जवळपास दहा मिनिटे समुद्राच्या पाण्यात धडपडणाऱ्या रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेन्डला दाम्पत्याने सुखरुप बाहेर काढले. रणवीरच्या मदतीला धावलेले दाम्पत्य आयपीएस अधिकारी आणि आयआरएस अधिकारी होते, अशी माहिती रणवीरने दिलीय. नाताळच्या दिवशी आम्ही दोघांनी चर्चमध्ये जाऊन मिळालेल्या नव्या आयुष्याबाबत देवाला धन्यवाद दिला. येणारे २०२५ वर्ष अधिक आशीवार्दाने भरलेले असेल, असे रणवीरने पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT