Suleman Khan: 'सुलेमान' प्रकरणात 12 मोबाईल जप्त! Viral Video बाबतीत टोलवाटोलवीची उत्तरे

Suleman Khan Case: सुलेमानने पहिल्या व्हिडिओमध्ये पोलिसांनीच त्याला कोठडीतून पलायन करण्यास मदत केली तसेच त्याच्या नावावर असलेल्या काही जमिनी बळकावण्यासाठीच एका आमदाराने पोलिसांकडून दबाव आणल्याचे आरोप केले होते.
Suleman Khan News
Suleman Khan Video ViralDainik Gomantak
Published on
Updated on

Suleman Khan Escape And Viral Video Inquiry

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याने क्राईम ब्रँच पोलिस कोठडीतून पलायन केल्यानंतर काढलेले दोन वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ते वेगवेगळ्या मोबाईलवरून काढण्यात आल्याची माहिती चौकशीवेळी जुने गोवे पोलिसांना सुलेमानने दिली आहे. हे दोन्ही व्हिडिओ काढण्यामागे त्याचा उद्देश काय होता, यासंदर्भात तो ठोस उत्तर देत नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

संशयित सुलेमानच्या पलायनप्रकरणी जुने गोवे पोलिसांत नोंद झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणातील जामिनावर असलेले संशयित अमित नाईक व हजरतसाब बावन्नावर ऊर्फ हजरत अली या दोघांच्या जबानीच्या आधारे त्याची चौकशी केली जात आहे. सुलेमानने पहिल्या व्हिडिओमध्ये पोलिसांनीच त्याला कोठडीतून पलायन करण्यास मदत केली तसेच त्याच्या नावावर असलेल्या काही जमिनी बळकावण्यासाठीच एका आमदाराने पोलिसांकडून दबाव आणल्याचे आरोप केले होते.

Suleman Khan News
Suleman Khan Case: 'सुलेमान'ला खोटे व्हिडिओ करण्यास कुणी भाग पाडले?

मात्र, त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याने हे आरोप ॲड. अमित पालेकर यांच्या सांगण्यावरून केल्याचे स्पष्टीकरण करून खळबळ माजवून दिली होती. या दोन्ही व्हिडिओमध्ये बोलताना संशयित सुलेमानच्या देहबोलीत काही संशय दिसून येत आहे, त्यामुळे त्याअनुषंगानेही चौकशी सुरू आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याने टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे. त्याने ज्या मोबाईलवरून हे व्हिडिओ काढले त्याचा शोध घेतला जात आहे. त्याला अटक केल्यानंतर सुमारे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, ते विविध नावांवर नोंद आहेत. त्याबाबतही चौकशी क्राईम ब्रँचच्या कोठडीत सुरू आहे.

Suleman Khan News
Suleman Khan Case: केरळमध्येही 'सुलेमान'चा प्रताप! पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न; Viral Video बाबत चौकशी सुरु

परत जाणार ‘एसआयटी’च्या ताब्यात!

१) ‘एसआयटी’च्या जमीन हडप प्रकरणातील चौकशीवेळी संशयित सुलेमान पोलिस कोठडीतून पळाला होता. त्यामुळे जुने गोवे पोलिसांकडून त्याची चौकशी संपल्यानंतर त्याला ‘एसआयटी’चे पथक पुन्हा ताब्यात घेणार आहे. त्यामुळेच सुलेमानने जामिनासाठी अजून हालचाली केलेल्या नाहीत. एसआयटीच्या कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता.

२) मात्र, हा अर्ज सुनावणीस आला तेव्हा पोलिसांनी सुलेमान फरारी झाल्याचे न्यायालयाला सांगितल्यावर तसेच त्याच्यातर्फे कोणीही वकील न्यायालयात उपस्थित न राहिल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता. सुलेमानच्या या पलायनामुळे न्यायालयाकडून त्याला जामीन मिळण्याची शक्यता मंदावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com