Navratri Celebration in Goa Dainik Gomantak
गोवा

Navratri in Goa: गोव्यात नवरात्रौत्सवाची दणक्यात सुरुवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याच्या विविध भागांमध्ये आजपासून नवरात्रौत्सव सुरु झाला आहे. नवरात्र म्हटलं की गोव्यात मखरांचा उत्सव हा प्रामुख्याने साजरा केला जातो मात्र विविध ठिकाणी भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. गावागावांमध्ये असेलेल्या छोट्याश्या मंदिरांमध्ये देखील स्थानिकांच्या मनोरंजनासाठी नाटकं, स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

आज गोव्यात अनेक ठिकाणी घटस्थापना करण्यात आली आणि देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात झाली. डिचोलीतील प्रसिद्ध शांतादुर्गेच्या मंदिरात नऊ दिवस कार्यक्रम होणार आहे, तसेच भाविक इथे रात्री कीर्तनाचा देखील आस्वाद घेऊ शकतात, मंदिरात पंचमी ते नवमी पर्यंत मखरोत्सव होणार आहे आणि शेवटच्या दिवशी पावणीने या उत्सवाची सांगता होईल अशी माहिती शांतादुर्गा देवस्थानाचे सचिव शामू गावकर यांनी दिली.

पार्शात देखील भाविकांकडून वाजतगाजत देवीच्या मूर्तीचे आगमन झाले असून येत्या नऊ दिवसांसाठी इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दांडिया तर असेलच मात्र सोबत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय केपे, वाळपई,मोरजी या ठिकाणी देखील नवरात्राच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 4 October 2024: 'या' राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ!! जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Bhumika Temple: नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भूमिका मंदिराला टाळा कोणी लावला; दोन गट आमने - सामने, हस्तक्षेप न करण्याची सूचना

उत्तर गोव्यातील घरफोड्यांच्या पर्दाफाश, अट्टल चोरासह फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्याला अटक; राज्यातील ठळक बातम्या

शव झेवियर यांचेच हे सिद्ध व्हायला नको का? एवढा राग कशासाठी? सुभाष वेलिंगकर DNA चाचणीवर ठाम

Ashwem News: अखेर वाद आटोक्यात!! दोन्ही गटांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक

SCROLL FOR NEXT