Goa Navratri Makharotsav: गोव्यात नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो?

Goa Navratri 2024: गोवा आणि नवरात्र म्हटलं की आवर्जून आठवण होते ती मखरोत्सवाची. गोव्यात असलेल्या प्रमुख मंदिरांत हा अनोखा उत्सव पाहायला मिळतो.
Goa Navratri 2024:  गोवा आणि नवरात्र म्हटलं की आवर्जून आठवण होते ती मखरोत्सवाची. गोव्यात असलेल्या प्रमुख मंदिरांत हा अनोखा उत्सव पाहायला मिळतो.
Makharotsav In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

How navratri is celebrated in Goa

पणजी : गुरुवारपासून देशभरात नवरात्रोत्सव सुरु झाला. गोवा आणि महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. देवी हे स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे. स्त्री एका नवीन जीवाला जन्म देते, त्याचं पालनपोषण करते आणि त्यानंतर त्या जीवाचा स्वतःचा प्रवास सुरु होतो. घटस्थापनेमधून हीच प्रक्रिया दाखवली जाते.

गोव्यात अनेक ठिकाणी कलशात काही धान्यं ठेवली जातात किंवा शेजारी रुजवण उगवली जाते. घट हे गर्भशयाचं प्रतीक आहे आणि त्यामधून हळूहळू येणार अंकुर म्हणजे गर्भाची होणारी वाढ. आता देवीचे नऊ दिवस याचा खरा अर्थ नऊ महिने आहे हे तुमच्या लक्ष्यात आलंच असेल. याशिवाय गोव्यात नऊ दिवस देवीला नऊ माळा अर्पण केल्या जातात. शरद ऋतूत आयुर्वेदाच्या अनुसार आपोआप पित्ताचा त्रास सुरु होतो आणि म्हणूनच सुवासिक फुलं,जे एकप्रकारे थंडपणाचं सुद्धा प्रतीक आहेत यांना महत्व दिलं जातं.

नवरात्रीत गोव्यातील मखरोत्सव What is Makharotsav

शारदीय नवरात्र संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. मात्र गोवा आणि नवरात्र म्हटलं की आवर्जून आठवण होते ती मखरोत्सवाची. गोव्यात असलेल्या प्रमुख मंदिरांत हा अनोखा उत्सव पाहायला मिळतो. मखरोत्सव गोव्यातील कलात्मक कौशल्य आणि प्रतिभा प्रदर्शित करतो. ‘नवरात्रीचे मखर’ एक प्रकारचं दिव्या आसन आहे. मखरात सजावट केलेली लाकडी चौकट असते ज्यावर देवी विराजमान होते. गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये मखरोत्सवाची प्रथा चालत आली आहे मात्र प्रामुख्याने फोंडा तालुक्यात मखरोत्सवाचे विविध प्रकार दिसतात.

Dainik Gomantak

मखरोत्सव हा केवळ देवीच्या मंदिरांमध्येच नाही तर मंगेशीतील मंगेशच्या मंदिरात सुद्धा तेवढाच प्रसिद्ध आहे.

Goa Navratri 2024:  गोवा आणि नवरात्र म्हटलं की आवर्जून आठवण होते ती मखरोत्सवाची. गोव्यात असलेल्या प्रमुख मंदिरांत हा अनोखा उत्सव पाहायला मिळतो.
Navratri 2024: स्थापत्यशैलीवर गॉथिक शैलीचा प्रभाव, पारसी माणसाची देणगी; बांदिवडेतील तेराव्या शतकातील मंदिराबद्दल माहितीये?

मखर म्हणजे काय?

लाकडापासून बनवलेल्या या मखरांवर सुंदर नक्षीकाम केलेले असते. त्याला काचेवर केलेल्या विविध चित्रकृती, तसेच रंगीबेरंगी कागदाच्या पताका आणि फुलांनी सजविलं जातं. उत्सवादरम्यान दर रात्री देवीला मखरात बसवतात.

काही मंदिरांमध्ये विविध आसनांवर देवाची मूर्ती बसवली जाते. दुर्गेची किंवा देवाची विविध रूपं या चौकटींमध्ये बसलेली असतात आणि रात्री भजनाच्या तालावर मखर फिरवलं जातं. विराजमान देवता समोर आणि मागे तसंच डाव्या आणि उजव्या हालचालींमध्ये फिरते आणि हे दृश्य पाहणं कायमच एक अविस्मारणीय अनुभव म्हणून स्मरणात राहतो.

मखराच्या वेळी तीन-चार प्रकारचे ताल वाजवले जातात आणि या तालाला धरून मखर फिरवलं जातं. अगदीच हळू सुरुवात झालेल्या मखरांची हालचाल तालासोबत वाढत जाते.

Goa Navratri 2024:  गोवा आणि नवरात्र म्हटलं की आवर्जून आठवण होते ती मखरोत्सवाची. गोव्यात असलेल्या प्रमुख मंदिरांत हा अनोखा उत्सव पाहायला मिळतो.
Navratri 2024: पुरुष सुद्धा नवरात्रीत करू शकतात खास लूक.कसं ??? जाणून घ्या!!

मखरोत्सवाचा इतिहास (History of Makharotsav)

मुळातच भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. पूर्वी गोव्यातील फोंडा तालुका हा सुपीक जमिनींपैकी एक होता आणि म्हणूनच इथे शेती मोठ्या प्रमाणात व्हायची. धान्याची भरभराट झाल्याने घरादारात पैसा यायचा आणि यासाठी देवीचे आभार म्हणून मखरोत्सवाची सुरुवात झाली, असे देखील सांगितले जाते.

Dainik Gomantak

शरद ऋतू थंडीचा महिना आहे, या काळात हवेत गारवा असतो आणि आभाळात चांदणं पसरतं म्हणूनच नवरात्राचे औचित्य साधून देवीला मखरात बसवून तिचे आभार मानले जायचे. असं म्हणतात या मखरोत्सवाची सुरुवात फोंड्यातील अंत्रुज महालातून झाली होती आणि आजच्या घडीला हा उत्सव गोव्याच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतो.

गोव्यात मखरोत्सव कुठे असतो?

फोंडा तालुक्यात श्री शांतादुर्गा (कवळे); श्री शांतेरी, श्री कामाक्षी आणि श्री रामनाथचे मखर (रामनाथी); श्री कपिलेश्वर (कपिलेश्वरी), श्री महालक्ष्मी (बांदिवडे), श्री नागेश महारुद्र (नागेशी), श्री म्हालसा-नारायणी (म्हार्दोळ); श्री मंगेश (मंगेशी); श्री कामाक्षी (शिरोडा); श्री देवकी-कृष्ण (माशेल) या मंदिरांमध्ये मखरोत्सव पाहायला मिळतो.

Dainik Gomantak

केरीच्या विजयादुर्गेचा मखरोत्सव मार्गशीर्ष महिन्यातील नवरात्रोत्सवात होतो. बाकी गोव्यातील इतर मंदिरांमध्ये सुद्धा मखरांची परंपरा आहे. बार्देश तालुक्यात श्री शांतादुर्गा मंदिर (कलंगुट) तर सासष्टी तालुक्यात श्री शांतादुर्गा ( फातर्पा); श्री म्हालसा-नारायणी मंदिर (वेर्णा) इथे जाऊन मखरांचा अनुभव घेता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com