Pickleball Dainik Gomantak
गोवा

Pickleball Tournaments 2023: गोव्यात 19 मे पासून राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धा

फातोर्डा येथे आयोजन: 16 राज्यातील अडीचशेहून जास्त खेळाडूंचा सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

देशभरातील 16 राज्यांतील अडीचशेहून जास्त खेळाडूंचा सहभाग असलेली तिसरी राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धा गोव्यात खेळली जाईल. स्पर्धा 19 ते 21मे या कालावधीत फातोर्डा येथे होईल.

अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेतर्फे गोवा पिकलबॉल संघटना आणि राज्य क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या सहकार्याने तीन दिवसीय स्पर्धा घेण्यात येत आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये पुणे येथे, तर २०२१ मध्ये महाराष्ट्रातील डोंबिवलीनजीक पालावा येथे राष्ट्रीय मानांकन स्पर्धा घेण्यात आली होती.

फातोर्डा येथे होणाऱ्या स्पर्धेत १४ वर्षांखालील, १९ वर्षांखालील गटात, पुरुष व महिला खुल्या गटात, ३५ वर्षांवरील पुरुष व महिला, ५० वर्षांवरील पुरुष व महिला गटात, तसेच मिश्र दुहेरीत सामने होतील. पिकलबॉल हा इनडोअर तसेच आऊटडोअर मैदानावर एकेरी आणि दुहेरीतील रॅकेट खेळ आहे.

देशातील प्रमुख पिकलबॉल खेळाडू तेजस महाजन, मयूर पाटील कुलदीप महाजन, ईशा लखानी, स्नेहल पाटील, वृशाली ठाकरे, हिमांश मेहता, अविनाश कुमार, सोनूकुमार विश्वकर्मा हे खुल्या गटात, तसेच हिमांशू देवसकर, संदीप तावडे, अजित भारद्वाज हे खेळाडू 35 वर्षांवरील आणि 50 वर्षांवरील गटात खेळतील. उद्योजक युवराज रुईया, आहारतज्ज्ञ डॉ. सरिता दावारे यांचाही स्पर्धेत सहभाग असेल.

अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू हे आंतरराष्ट्रीय पिकलबॉल महासंघाचेही प्रमुख आहेत.

राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेला उत्साही प्रतिसाद लाभत असून देशात हा खेळ वाढत असल्याचे प्रभू यांनी सांगितले. या खेळास भारतातील कानाकोपऱ्यात नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT