Anjuna Beach: समुद्रकिनाऱ्यावरील दोन दगडांमध्ये अडकला कर्नाटकच्या युवकाचा पाय; अखेर फायरब्रिगेडला बोलवावे लागले...

हणजुणे बीचवरील घटना; दगड फोडून केली सुटका
Anjuna Beach incident
Anjuna Beach incidentDainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna Beach: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर फिरताना पर्यटक अनेकदा उत्साहाच्या भरात तरा काहीवेळा जाणते-अजाणतेपणे चुकीचे काही करून बसतात. हणजुणे बीचवर असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे शुक्रवारी समुद्रकिनाऱ्यावरील दोन खडकांच्या फटीत एका तरूणाचा पाय अडकला.

अनेक प्रयत्न करूनही तरूणाला पाय बाहेर काढता आला नाही. अखेर त्यासाठी फायरब्रिगेडला बोलवावे लागले. दरम्यान, फायरब्रिगेडच्या जवांनांनी दगड फोडून या तरूणाची सुटका केली.

Anjuna Beach incident
Kadamba Transport: दिव्यांगांसाठी अनुकूल 20 नवीन इलेक्ट्रिक बसेस 'कदंबा'च्या ताफ्यात दाखल होणार

अल्विन डिसुझा (वय 33 वर्षे) असे या युवकाचे नाव आहे. तो मूळचा कुंदापुरा (उडुपी, कर्नाटक) येथील आहे.

समुद्रात जलक्रीडा केल्यानंतर अल्विन या दगडावर आला होता. तेथे चुकून त्याचा पाय दोन दगडांच्या फटीत अडकला. त्याने तसेच त्याच्या सहकाऱ्यांनी खूप प्रयत्न करूनही पाय बाहेर निघाला नाही. त्यामुळे काही तास अल्विनला तिथेच अडकून पडावे लागले.

अखेर अग्निशमन दलाला ही घटना कळविण्यात आली. त्यावेळी अग्निशमन दलाचे जवान शाहिद खान, प्रेमानंद कांबळी, दत्तराज च्यारी, सानिल बाणावलीकर, चंद्रकांत नाईक, दिप्तेश गावडे यांनी दगड फोडून पायासाठी वाट करून अल्विन याचा पाय सुखरूपपणे बाहेर काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Avani Sawant Cricket Performance
Arpora Illegal Hill Cutting Case
Double Thigh Replantation Surgery China
Tourist Drowns In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com