Goa CM On 'The Kerala Story': ‘द केरळ स्टोरी’ बाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांना...

दहशतवादाची वाढ थांबवणे काळाची गरज- मुख्यमंत्री
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Goa CM On The Kerala Story सध्या देशात आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट गाजत या चित्रपटावरून बरीच मतमतांतरं आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडात आहेत.

देशातील काही राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. अनेक नेत्यानी या चित्रपटाला समर्थन दिले आहे तर अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत त्याच्यावर टिका केली आहे.

CM Pramod Sawant
Anjuna Beach: समुद्रकिनाऱ्यावरील दोन दगडांमध्ये अडकला कर्नाटकच्या युवकाचा पाय; अखेर फायरब्रिगेडला बोलवावे लागले...

यातच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या चित्रपटाबद्दल एक विधान केलं आहे. लोकांनी विशेषत: पालकांनी आपल्या मुलांना घेऊन वास्तव जाणून घेण्यासाठी 'द केरळ स्टोरी' पाहण्याचे आवाहन सावंत यांनी केले आहे.

या चित्रपटाचे कथानक हे दहशतवादावर आहे. देशातील दहशतवादाची वाढ थांबवणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

CM Pramod Sawant
Goa Liquor Seized: पत्रादेवी चेकपोस्टवर दारू जप्त, तब्बल 'एवढ्या' लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतलाय ताब्यात

तसेच लहान मुलांचे विशेषतः मुलीचे ब्रेनवॉश केले जात असून त्यांना जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास भाग पाडले जातेय.

चित्रपट करमुक्त नसला तरीही पालकांनी मुलांसह हा चित्रपट येऊन बघावा असे आवाहन सावंत यांनी केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com