Narvem railway track stray cattle accident 
गोवा

रेल्वेच्या धडकेने जाताहेत गुरांचे बळी, नार्वेत मोकाट गुरे बसतात रुळावर; गोशाळेत करणार रवानगी

Narvem railway track stray cattle accident: नार्वे गावात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

Sameer Amunekar

डिचोली: नार्वे गावात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. दिवसरात्र गावातील रस्त्यांवर भटकंती करणाऱ्या या मोकाट गुरांचा गावातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या रुळावरही संचार वाढला आहे.

रुळावर ठाण मांडणाऱ्या गुरांना रेल्वेची धडक बसून गुरांचे बळी जाण्याचे प्रकारही वाढत आहेत. कोकण रेल्वेनेही या प्रकाराची गंभीर दखल घेताना गुरे मोकाट सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार चालविला आहे.

दरम्यान, गावात मोकाट फिरणाऱ्या गुरांना पकडून त्यांची गोशाळेत रवानगी करण्याचा निर्णय नार्वे पंचायतीने घेतला आहे. नार्वे गावात फेरीधक्का आदी परिसरात तर खासकरून रात्रीची मोकाट गुरांची समस्या अधिक जाणवते. सर्वत्र कळपाने गुरांचा वावर असतो.

रस्त्यावरील गुरांच्या मुक्त संचारामुळे वाहने हाकताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. मोकाट गुरांच्या वाढत्या संचारामुळे एखादेवेळी भयानक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, तशी भीतीही वाहनचालक व्यक्त करीत आहेत. ही गुरे शेती-बागायतींचीदेखील नासधूस करतात.

दरम्यान, मोकाट गुरे रात्रीच्यावेळी गावातून गेलेल्या रेल्वेच्या रुळावर विसावा घेतात. त्यामुळे रेल्वे आल्यावर रुळावर ठाण मांडणाऱ्या गुरांचे नाहक बळी जातात. या गुरांमुळे एखादेवेळी रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

गेल्या वर्षभरात रेल्वेची धडक बसून नार्वे गावात २५च्या आसपास गुरांचे बळी गेले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. नार्वे गावात रेल्वे रुळावरील मोकाट गुरांचा संचार आणि अपघातांची कोकण रेल्वेनेही गंभीर दखल घेतली आहे.

बावीस दिवसांपूर्वी म्हणजेच ३ मे रोजी कोकण रेल्वेचे पोलिस अधिकारी नार्वे गावात येऊन त्यांनी मोकाट गुरांविरोधात जागृती केली होती. गुरांना रेल्वे रुळावर सोडू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

SCROLL FOR NEXT