Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Amit Patkar Congress Handover: अध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे गेल्यानंतर पाटकर प्रथमच काँग्रेस कार्यालयात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.
Amit Patkar Congress Handover
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी बुधवारी प्रथमच पणजी येथील काँग्रेस भवनाला भेट देत आपल्या पदाचा कार्यभार औपचारिकरीत्या सुपूर्द केला. पक्षाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित अधिकृत कागदपत्रे, नोंदी आणि इतर आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यासाठीच ही भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाटकर यांनी सांगितले की, माझी ही भेट केवळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असून अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील सर्व अधिकृत कागदपत्रे नियमानुसार सुपूर्द करण्यासाठी आलो आहे. नेतृत्वबदलानंतर पक्षातील संक्रमण प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण व्हावी, हा या भेटीचा उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Amit Patkar Congress Handover
Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

अध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे गेल्यानंतर पाटकर प्रथमच काँग्रेस कार्यालयात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. मात्र, या भेटीला कोणतेही राजकीय संकेत जोडू नयेत, असे सूचित करत त्यांनी ही केवळ औपचारिक प्रक्रिया असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

पाटकर हे काँग्रेसचेच : ठाकरे

पाटकर यांच्या पक्षातील भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पाटकर हे काँग्रेसचेच नेते असून पक्षात सक्रिय असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नसून सर्व नेते संघटना बळकट करण्यासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचा दावा केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संघटनात्मक बांधणीवर भर देत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com