गोवा

पर्वरीतील नरकासूर स्पर्धा; हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल सरकारचा निषेध करण्याचे धाडस ढवळीकरांनी करावे - काँग्रेस

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी 13 नोव्हेंबर रोजी पर्वरी येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला ते स्वतः का अनुपस्थित होते याचे स्पष्टीकरण द्यावे.

Pramod Yadav

पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या जमिनीवर पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या नरकासूर स्पर्धेमुळे सनातन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. यापूर्वी काँग्रेस पक्षावर आरोप करणारे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आता हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल भाजप सरकारचा निषेध करण्याचे धाडस करावे, अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.

काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अमरनाथ पणजीकर यांनी पर्वरी येथील नरकासुर स्पर्धा दिवाळीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत चालू ठेवून पर्यटन खात्याने पहाटे नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा मोडीत काढल्याचा आरोप केला.

पत्रकार परिषदेला उत्तर गोवा जिल्हा सचिव प्रणव परब, कुंभारजुवा गट कॉंग्रेस अध्यक्ष विशाल वळवईकर आणि सांताक्रुझ गट कॉंग्रेस अध्यक्ष जॉन नाझारेथ उपस्थित होते.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी 13 नोव्हेंबर रोजी पर्वरी येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला ते स्वतः का अनुपस्थित होते याचे स्पष्टीकरण द्यावे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि रोहन खंवटे यांनी तेथे जाब विचारण्यास आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रश्नाना उत्तरे देण्याचे धाडस नसल्यानेच घाबरून कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

स्थानिक आमदार आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे हेच दूर राहिलेल्या व अखेर फ्लॉप शो ठरलेल्या नरकासुर कार्यक्रमावर पर्यटन विभागाने जनतेचा करोडोचा पैसा खर्च केला आहे. एकच गद्दार आमदार बक्षीस वितरणासाठी गेला होता कारण त्याला कुठेही जाण्याची सवय आहे, असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी लगावला.

सनातन धर्माच्या परंपरांचा आदर न करणाऱ्या भाजप सरकारची ही लाजिरवाणी कृती आहे. बेजबाबदार पर्यटन विभागाकडून स्पर्धेदरम्यान पाश्चात संगीत वाजवण्यात आले. गोव्याची खरी संस्कृती पर्यटकांना दाखविण्याची जबाबदारी असलेल्या पर्यटन खात्याचे हे मूर्खपणाचे कृत्य आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Roy Naik: 'आपली तयारी, पण पक्षाचा निर्णय अंतिम'! फोंड्यातील पोटनिवडणुकीबद्दल रॉय नाईकांचे स्पष्टीकरण

Uguem Firing: कोणी केला गोळीबार? उगवे प्रकारणानंतर राज्यात खळबळ, 7 जण ताब्यात; दोन्ही जखमी कामगार बिहारचे

Horoscope: कामात यश, प्रेमात स्थैर्य आणि पैशात वाढ; आजचा दिवस कोणासाठी भाग्यवर्धक?

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT