Mungul Margao gangwar Dainik Gomantak
गोवा

Mungul Margao: हल्‍ला करण्‍यासाठी राजस्‍थानहून गोव्‍यात बोलावले! मुंगूल प्रकरणी 23 जणांना अटक; बिश्नोई गँग कनेक्‍शन उघड

Lawrence Bishnoi gang Goa: या प्रकरणात वापरलेली कार पोलिसांनी बोरकर याच्‍याकडून जप्‍त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात २३ संशयितांना अटक करण्‍यात आली असून त्‍यांच्‍याकडून एकूण सात वाहने जप्‍त केली आहेत.

Sameer Panditrao

मडगाव : मुंगूल-मडगाव येथे १५ दिवसांपूर्वी झालेल्‍या गँगवॉरचे मुंबईतील कुख्‍यात लॉरेन्‍स बिश्‍‍नोई गँगशी कनेक्‍शन असल्‍याचे उघड झाले असून या गँगचा म्‍होरक्‍या म्‍हणून ओळखला जाणारा ओम प्रकाश राम उर्फ ओमसा (वय ३० वर्षे) याला फातोर्डा पोलिसांनी राजस्‍थान येथून अटक करून आज गोव्‍यात आणले.

हा हल्‍ला करण्‍यासाठी गोव्‍यातील गुंडांनी ओमसाला मुद्दाम राजस्‍थानहून गोव्‍यात बोलावून घेतले होते, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. या कामात पुढाकार घेणाऱ्या अमोघ नाईक गँगच्‍या सूरज नाईक बोरकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात वापरलेली इनोव्‍हा कार पोलिसांनी सूरज बोरकर याच्‍याकडून जप्‍त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात २३ संशयितांना अटक करण्‍यात आली असून त्‍यांच्‍याकडून एकूण सात वाहने जप्‍त केली आहेत.

त्‍याशिवाय या हल्‍ल्‍यात वापरलेल्या पिस्‍तुलासह काेयते, लोखंडी सळ्‍या आणि तलवारी जप्‍त केल्‍या आहेत. १२ ऑगस्‍ट रोजी वॉल्‍टर गँगच्‍या युवकेश सिंग आणि रफीक तशान या दोन गुंडांवर सुमारे २० ते २५ गुंडांनी हल्‍ला चढविला होता.

दक्षिण गोव्‍यातील गुन्‍हेगारी जगतावर वर्चस्‍व मिळविण्‍यासाठी वॉल्‍टर गँगच्‍या विरोधात गोव्‍यातील बाकीच्या गुन्हेगारी गटांनी एकत्र येऊन हा हल्‍ला चढविला होता. या गटांना बिश्‍‍नोई गँगचा पाठिंबा हाेता, असे त्‍यावेळी सांगण्‍यात आले होते.

फातोर्डा पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अटक केलेला ओमसा हा राजस्थान येथील  भद्रंजून-जल्लोरी येथील  असून, त्याचा लॉरेन्स गँगशी संबंध  आहे. त्याच्याविरोधात तब्बल १५ गंभीर गुन्हे तेथील पोलिसांत नोंद झाले आहेत.  

गोवा पोलिसांनी राजस्थान येथे त्‍याच्‍या मुसक्‍या आवळल्या .  पोलिसांनी गोव्यात आणल्यानंतर त्याला रितसर अटक करून न्यायालयात उभे करून सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांच्या हिट लिस्टवर आणखी सहाजण

१अमोघ नाईक हाच बिश्‍‍नोई गँगमधील ओमसाच्‍या संपर्कात हाेता आणि त्‍यानेच त्‍याला गाेव्‍यात बाेलावून घेतले होते.

२या प्रकरणात अटक केलेला सूरज बोरकर याला अमोघचा उजवा हात म्‍हणून ओळखले जाते.

३या गँगवार प्रकरणात केपे येथील गँगस्‍टर वेली डिकाॅस्‍ता याचाही हात असून त्‍याच्‍यासह आणखी सहा जणांच्‍या शोधात पोलिस असल्‍याची माहिती प्राप्‍त झाली आहे.

ओमसाने पिस्तुल पुरविल्याचा संशय

ओमसा हा पिस्तुलाचा पुरवठा करीत असून, त्याला खास मुंगुल येथील  हल्ला प्रकरणात बोलावून घेतले होते, असे प्राथमिक पोलिस तपासात उघड झाले आहे. या हल्‍ल्‍यात ज्‍या पिस्‍तुलाचा वापर केला, त्‍याचा पुरवठा ओमसानेच केला हाेता का, याचा तपास गोवा पोलिस करत आहेत.

अमोघ, वेलीविरोधात ‘लुकआऊट’

गोव्‍यातील कुख्‍यात गँगस्‍टर म्‍हणून ओळखले जाणारे अमोघ नाईक आणि वेली डिकॉस्‍ता यांचाही या हल्‍ल्‍याशी संबंध असून सध्‍या ते दोघेही गायब आहेत. पोलिसांनी या दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Market Fire: साखळी बाजारात आग्नीतांडव! भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक, सुमारे 60 लाखांचे नुकसान

Taliban Punishment: अफगाणिस्तानात तालिबानच्या क्रूरतेचा कळस! 20 महिलांसह 114 जणांना दिली 'क्रूर शिक्षा'; जगभरातून व्यक्त होतोय संताप

Dinesh Karthik Captain: टीम इंडियाची कमान दिनेश कार्तिककडे: 'या' मोठ्या स्पर्धेत करणार नेतृत्व, भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष

Cricketer Retirement: क्रिकेटला अलविदा! वकील होण्यासाठी 'या' स्टार खेळाडूनं घेतला निवृत्तीचा निर्णय, क्रीडाविश्वात खळबळ

‘त्या’ मास्टरमाईंडलाही अटक करा! दक्षिण गोवा भाजपच्या माजी खासदाराची पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT