Mungul Gangwar: गाडीवरती प्राणघातक हल्ला, गोळीबार; मुंगुल गॅंगवॉर प्रकरणातील फरार गुन्हेगार कोल्हापूरात जेरबंद

Goa Crime News: मुंगुल गॅंगवॉर प्रकरणात पोलिसांना वॉन्‍टेड असलेल्‍या वॅली गँगचा पंटर जावेद बादशाह याला फातोर्डा पोलिसांनी शेवटी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे अटक केली.
Arrested News
ArrestedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: मुंगुल गॅंगवॉर प्रकरणात पोलिसांना वॉन्‍टेड असलेल्‍या वॅली गँगचा पंटर जावेद बादशाह याला फातोर्डा पोलिसांनी शेवटी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेला  जावेद हा बाविसावा संशयित आहे.  

गॅंगवॉरची  घटना घडल्यानंतर तो फरार झाला होता. कोल्हापूर येथील शाहूपुरी भागात तो असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. जावेदच्‍या अटकेमुळे या गँगवाॅरमध्‍ये वॅली गँगच्‍याही गुंडांचा हात होता हे आता स्‍पष्‍ट झाले आहे. जावेद फरार होऊन त्‍याने कोल्‍हापुरात आसरा घेतला आहे. याची माहिती पोलिसांना मिळाल्‍यावर पोलिस त्याच्या पाळतीवर होते. बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याच्या हाती बेड्या ठोकल्या.  

१२ ऑगस्ट रोजी गॅंगवॉरची वरील घटना घडली  होती. संशयितांनी वॉल्टर गँगच्या युवकेश सिंग (२०) व रफिक ताशन (२४) या दोघांवर प्राणघातक हल्ला चढविला होता. त्‍यावेळी गोळीबारही करण्‍यात आला होता. या दोघांची प्रकृती आता सुधारल्यानंतर  त्यांना इस्पितळातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.  गँगच्या दुष्मनीतून हल्ल्याची ही घटना घडली होती.

Arrested News
Goa Crime: खंडणीखोर 'वॉल्‍टर गँग'च्या म्‍होरक्‍याला अटक! मुंगूलमध्ये झाला होता खुनी हल्ला; गन आणि गोळ्या जप्त

दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्‍या मंदार प्रभू गावकर याने हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र या हल्‍ल्‍यात खरेच या पिस्‍तुलाचा वापर केला की तो बनाव करतो हा पोलिसांना संशय आहे. प्रत्यक्षात ज्या पिस्तुलाचा वापर केला होता ते दुसरेच तर नव्‍हते ना अशी शंका पोलीस घेऊ लागले आहेत.

Arrested News
Mungul Gang War: संशयितांना पकडले, नातेवाईकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक; मुंगूल गँगवॉर प्रकरणाने घेतले हिंसक वळण

आपल्या अन्य साथीदारांच्या बचावासाठी हा संशयित पोलिसांची दिशाभूल करीत आहे असे प्राथमिक पोलिस तपासात आढळून  आले आहे. एकंदर या प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने पोलिसांनीही तपासकामाबाबत  कमालीची   गुप्तता बाळगली आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Casino Director Shooting Case
Why 1980s Are Trending in India
Maharashtra Crime News
America Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com