Mungul Crime: मुंगूल गँगवॉरमधील 17 संशयितांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी, पाचजण अजून पोलिस कोठडीत

Goa Crime: मुंगूल-मडगाव येथे झालेल्‍या गँगवॉर प्रकरणात अटक केलेल्‍या २२ संशयितांपैकी १७ संशयितांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड संपल्‍याने मडगाव न्‍यायालयाने त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली.
Mungul Crime
Mungul CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : गँगच्‍या वैमनस्‍यांतून १२ रोजी मुंगूल-मडगाव येथे झालेल्‍या गँगवॉर प्रकरणात अटक केलेल्‍या २२ संशयितांपैकी १७ संशयितांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड संपल्‍याने मडगाव न्‍यायालयाने त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. ५ संशयितांच्‍या पोलीस कोठडीचा रिमांड अजूनही बाकी आहे.

१२ रोजी वेगवेगळ्‍या गँगमधील गुंडांनी एकत्र येऊन वॉल्‍टर गँगचा सदस्‍य असलेल्‍या रफीक तशान आणि युवकेश सिंग या दोघांवर पहाटे २.३० च्‍या सुमारास सोडा वॉटर बाटल्‍या, कोयते आणि लोखंडी सळ्यांनी हल्‍ला केला होता. त्‍यातील एकाने या दोन्‍ही युवकांवर गोळीबारही केला होता.

Mungul Crime
Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

या प्रकरणात नंतर फातोर्डा पोलिसांनी तब्‍बल २२ संशयितांना अटक केली होती. एक संशयित फरार आहे. हा करण्‍यासाठी वापरण्‍यात आलेल्‍या सोडा वॉटर बाटल्‍यांसह फातोर्डा पोलिसांनी कोयता आणि एक पिस्‍तुल जप्‍त केले असून त्‍याशिवाय पिस्‍तुलच्या गोळ्‍याही जप्‍त केल्‍या होत्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Curtorim Police Station Assault Case
Vasco Gold Loan Fraud
Custodial Assault Allegations
Margao Woman Cheated 33 lakhs
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com