Damaged motorcycle and car after a road accident in Mulgao, Goa Dainik Gomantak
गोवा

Mulgao Accident: मुळगाव येथे भीषण अपघात; ओव्हरटेकच्या नादात कारची दुचाकीला धडक, दोघे जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक

Mulgao Accident Car Hits Electric Pole and bike: मुळगाव येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Sameer Amunekar

मुळगाव येथे घडलेल्या भीषण रस्ता अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

कारचा ताबा सुटल्याने अपघात

प्राथमिक माहितीनुसार, कारचालक पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली.

एकाची प्रकृती चिंताजनक

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना मदत करून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दोघांवर उपचार सुरू असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कारचा वेग, चालकाचा वाहनावरील ताबा किंवा इतर कोणते कारण याचा तपास सुरू आहे. तसेच अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT