Goa Cyber Crime: कष्टाची कमाई ऑनलाईन चोरांच्या घशात! पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने नुवेच्या महिलेला 4.47 लाखांचा गंडा; सायबर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Facebook Part Time Job Scam: फेसबुकवर ‘पार्ट टाईम जॉब’चे आकर्षक आमिष दाखवून नुवे येथील एका महिलेला तब्बल ४.४७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 Goa Facebook Part Time Job Scam
Goa Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: फेसबुकवर ‘पार्ट टाईम जॉब’चे आकर्षक आमिष दाखवून नुवे येथील एका महिलेला तब्बल ४.४७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुवे येथील गोरवटी येथील रहिवासी असलेल्या वियोला इव्हा फर्नांडिस यांनी यासंदर्भात मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.१० च्या सुमारास फेसबुकवर स्क्रोल करत असताना त्यांना घरबसल्या अर्धवेळ नोकरी देणारी एक जाहिरात दिसली.

 Goa Facebook Part Time Job Scam
Goa Cyber Crime: फोंड्यात ऑनलाईन भामट्यांचा मोठा धुमाकूळ! अवघ्या 6 महिन्यांत नागरिकांना 15 लाखांचा गंडा, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

ही जाहिरात खरी असल्याचे समजून त्यांनी तिथे संपर्क साधला. सुरुवातीला संशयित आरोपीने त्यांना ऑनलाईन ॲपवर काही वस्तूंचे ‘रिव्ह्यू आणि रेटिंग’ करण्याचे डिजिटल काम दिले. या महिलेला जाळ्यात पूर्णपणे ओढण्यासाठी संशयिताने सुरुवातीचे टास्क पूर्ण होताच तिच्या बँक खात्यात ५,००० रुपये जमा केले.

खात्यात पैसे आल्यामुळे महिलेचा या कामावरील विश्वास वाढला. त्यानंतर संशयिताने तिच्याकडून मोठ्या रकमा ट्रान्स्फर करून घेण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या टप्प्यांवर महिलेने एकूण ४,४७,५०० रुपये संशयिताच्या खात्यात पाठवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com