Khariwada Fish Sellers Dainik Gomantak
गोवा

Mormugao: खारीवाड्यात घाऊक विक्रेत्यांची मासळी जप्त! मुरगाव पालिकेची कारवाई; मार्केट विक्रेत्यांच्या तक्रारी

Mormugao Khariwada: मोकळ्या जागेत मासे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही अटी मुरगाव पालिकेसमोर ठेवल्या होत्या. त्या मुरगाव पालिकेने मान्य होत्या. त्या अटीची आता आठवण करून दिली जात आहे.

Sameer Panditrao

वास्को: मासे विक्रेत्यांनी केलेल्या मागणीनुसार मुरगाव पालिकेने खारीवाडा येथील घाऊक मासे विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. मुरगाव पालिकेने गुरुवारी (ता. १०) त्या घाऊक मासे विक्रेत्यांविरोधात कारवाई करताना काही मासळी जप्त केली होती. येथे मासे मार्केटाची नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

त्यामुळे कदाचित पुढील आठवड्यात त्या इमारतीचे उद्‍घाटन करण्यात येईल. सदर नवीन इमारत बांधण्यापूर्वी तेथील मासे विक्रेत्यांना साळगावकर इमारतीलगतच्या मोकळ्या जागेत हलविण्यात आले होते. आता नवीन मासे मार्केट पूर्ण झाल्याने त्यांना तेथे हलविण्यात येणार आहे. तथापि त्यापूर्वी आमच्या अटी पूर्ण करा अशी त्यांनी मागणी केली आहे.

त्यांनी मोकळ्या जागेत मासे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही अटी मुरगाव पालिकेसमोर ठेवल्या होत्या. त्या मुरगाव पालिकेने मान्य होत्या. त्या अटीची आता आठवण करून दिली जात आहे.त्यामध्ये खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद करण्याची अट होती.

खारीवाडा येथे घाऊक मासे विक्री केली जाते. पूर्वी तेथे दोन तीन घाऊक मासे विक्रेते होते. परंतु आता तेथे संख्या वाढत गेली आहे.तेथे स्वस्त दरात मासे विक्री करण्यात येत असल्याने ग्राहकांची गर्दी उसळते. त्यामुळे मोकळ्या जागेत मासे विक्री करणाऱ्या मासे विक्रेत्यांनी घाऊक मासे विक्रेत्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्या घाऊक मासे विक्रेत्यांमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वीही त्या घाऊक मासे विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. परंतु दोन तीन दिवसांनंतर सदर व्यवहार तेथे पुन्हा सुरू झाले.

कारवाईचा परिणाम!

आता तेथील व्यवसाय पूर्णपणे बंद केल्याशिवाय आम्ही नवीन मासे मार्केटात जाणार नाही, असा पवित्रा मासे विक्रेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुरगाव पालिकेने घाऊक विक्रेत्यांना नोटिसा पाठवून व्यवसाय बंद करण्यास सांगितले होते. तथापि तेथे व्यवसाय सुरू राहिल्याने मासे जप्त करण्याची कारवाई मुरगाव पालिकेने केली. आता ही कारवाई किती दिवस टिकते? कारवाईचा परिणाम काय होणार हे, पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT