Vasco: "खारीवाड्याला 'फिशिंग व्हिलेज' घोषित करा, घरांनाही संरक्षण द्या", मच्छिमारांची मागणी

Vasco Goa coastline management: गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने गोवा मत्स्योद्योग खात्याच्या सहकार्याने येथील खारीवाडा भागातील घरांचे सर्वेक्षण सुरू केल्याने स्थानिक मच्छिमार बांधवांनी समाधान व्यक्त केले.
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने गोवा मत्स्योद्योग खात्याच्या सहकार्याने येथील खारीवाडा भागातील घरांचे सर्वेक्षण सुरू केल्याने स्थानिक मच्छिमार बांधवांनी समाधान व्यक्त केले. सरकारने मच्छिमार बांधवांची घरे सर्वेक्षण आराखड्यात दाखवून संबंधित भाग ‘फिशिंग व्हिलेज’ म्हणून घोषित करावीत, अशी मागणी खारीवाडा होडी मालक संघटनेचे अध्यक्ष क्रिस्तोडियो डिसौझा यांनी केली आहे.

सरकारने सुरू केलेल्या सर्वेक्षणाला आमचे पूर्ण सहकार्य असेल, असे माजी मंत्री व अखिल गोवा फिशिंग ट्रॉलर्स मालक संघटनेचे पदाधिकारी जुझे फिलिप डिसौझा यांनी सांगितले. खारीवाडा, बायणा किनारपट्टीवर बऱ्याच मच्छिमार बांधवांची घरे आहेत. त्याचा वापर ते स्वतःसाठी तसेच आपली जाळे व इतर साहित्य ठेवण्यासाठी करतात.

त्याशिवाय त्या घरांमध्ये त्यांचे कामगारही वास्तव्य करतात. सदर घरांना संरक्षण मिळावे तसेच सदर भाग फिशिंग व्हिलेज म्हणून घोषित करावे, यासाठी संबंधित मच्छिमार बांधव सतत मागणी करीत आहेत. मध्यंतरी खारीवाडा येथील घरे आपल्या क्षेत्रात येत असल्याचे जाहीर करून तत्कालीन एमपीटीने ती मोडण्याची तयारी केली होती.

Vasco
Jainism History In Goa: बांदिवडे गावात होती जैन वस्ती; गोव्याचा अपरिचित इतिहास

तथापि ती रोखण्यात आली. त्यामुळे तेथील रहिवाशांना ती घरे मोडण्यात येतील, अशी भिती सतत भेडसावत असते. आता तेथे सर्वेक्षण सुरु करण्यात आल्याने संबंधितांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर सर्वेक्षण गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापनाने प्राधिकरण व मत्स्योद्योग विभागातर्फे सुरु केले आहे.

आम्ही सर्वेक्षण करून त्या घरांचे योग्य मॅपिंग करणार आहोत. त्यानंतर ते प्राधिकरणाला सोपविण्यात येईल. आणीबाणीच्याप्रसंगी किनारपट्टीवरील मच्छिमारी बांधवांना योग्य साहाय्य मिळावे, तसेच इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सदर सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Vasco
Goa Mangroves: खारफुटी क्षेत्र बचावासाठी सरकारचा मोठा निर्णय; अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणाबाबत मंत्री राणेंनी दिला स्पष्ट इशारा

सर्वेक्षणाचे स्वागत

येथील किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांच्या घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, ही चांगली गोष्ट आहे, या सर्वेक्षणाचे स्वागत आहे, असे जुझे फिलिप डिसौझा यांनी सांगितले. या घरांमध्ये ते जाळे व इतर साम्रगी ठेवतात. मच्छिमार बोटीवर कामे करणारे कामगारही येथे राहतात.

आमची संबंधित बांधकामे पूर्वी काठापासून दूर होती. एमपीटीने समुद्रातील गाळ उपसा केल्याने तेथील पाण्याची खोली वाढली आहे. त्यामुळे पाणी रहिवाशांच्या घरांपर्यंत पोहचत आहे, असेही डिसौझा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com