Vasco: गुरांच्या जिभा प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार; 2 खोक्यांमध्ये आढळल्या होत्या 140 जिभा, पोलीस तपास सुरू

Vasco Cattle Tongues Case: चिकनच्या नावाखाली गुरांच्या जिभा असलेली दोन पार्सल्स वास्को रेल्वे स्थानकावर पाठविण्यात आली होती.
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून वास्को रेल्वे स्थानकावर पाच दिवसांपूर्वी पाठविण्यात आलेल्या गुरांच्या जिभांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जबीर नूर सिदनूरच्या साथीदारांचा तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध वास्को रेल्वे पोलिस घेत आहेत. जबीर हा सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याचा रिमाड उद्या संपणार आहे.

चिकनच्या नावाखाली गुरांच्या जिभा असलेली दोन पार्सल्स वास्को रेल्वे स्थानकावर पाठविण्यात आली होती. २९ मार्च रोजी सकाळी ९ वा.च्या दरम्यान गस्तीवर असलेले वास्को रेल्वे स्थानकाचे निरीक्षक अमरनाथ पासी व उपनिरीक्षक कृष्णा तालपी हे पार्सल ऑफिससमोरून जात होते. त्यावेळी त्यांना दुर्गधी आली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली.

तेथील दोन खोक्यांतून ती दुर्गंधी येत असल्याचे आढळून आले. ती दोन पार्सल्स नेण्यासाठी आलेल्या जबीरकडे त्यांनी चौकशी केली असता, त्या पार्सलमध्ये चिकन असल्याचा दावा त्याने केला. मात्र, त्या पार्सलसंबंधी संशय आल्याने, त्याला ती उघडण्यास सांगितले.

Vasco
Goa Job: "प्रत्येक मतदारसंघात 300 नोकऱ्या...", गोव्यातील युवकांसाठी CM सावंतांची मोठी घोषणा

तेव्हा त्या दोन खोक्यांमध्ये गुरांच्या १४० जिभा आढळून आल्या. याप्रकरणी पशुवैद्यकाला पाचारण केल्यावर त्यांनी अहवाल दिला. त्यानंतर सर्व सोपस्कारानंतर त्या जिभांची विल्हेवाट लावण्यात आली.

जबीर हा मूळचा बेळगावी-कर्नाटकचा असून, सध्या तो मडगाव येथे राहतो. ती पार्सल्स एका व्यक्तीने मागविली होती, ती नेण्यासाठी जबीर आला होता. त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला, अशी माहिती मिळाली. ती पार्सल्स ज्या व्यक्तीने मागविली होती, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी निरीक्षक पासी पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com