Mopa Airport Taxi Protest Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport Taxi Protest: मोपा टॅक्सी आंदोलन प्रकरणी आमदार सरदेसाईंसह 54 जणांवर गुन्हे दाखल; 15 जूनला चौकशीसाठी पाचारण

Goa Police Summons June 15: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षी टॅक्सी व्यावसायिकांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षी टॅक्सी व्यावसायिकांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. २९ सप्टेंबर २०२५ रोजी विमानतळ परिसरात बेकायदा जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांच्यासह ५४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांना आता १५ जून रोजी चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोपा विमानतळाचे संचालन करणाऱ्या 'जीएमआर' (GMR) कंपनीने टॅक्सी चालकांसाठी जाचक नियम लागू केले होते. विशेषतः प्रवाशांना विमानतळावर सोडण्यासाठी (Drop) येणाऱ्या वाहनांना केवळ पाच मिनिटांची वेळ मर्यादा देण्यात आली होती. जर वाहन पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबले, तर अव्वाच्या सव्वा पार्किंग शुल्क आणि दंड वसूल केला जात होता. या 'लूट' आणि कठोर नियमांविरोधात स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांमध्ये मोठा असंतोष होता.

या जाचक अटींच्या निषेधार्थ २९ सप्टेंबर २०२५ रोजी आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सी व्यावसायिकांनी मोपा विमानतळावर धडक दिली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना गर्दी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण ५४ जणांची नावे एफआयआरमध्ये (FIR) समाविष्ट आहेत.

आमदार विजय सरदेसाई यांच्यासोबतच गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, अभिषेक तोरस्कर आणि निखिल महाले, रामा वारंग, भारत वरक, साहिल मलिक, रमेश वरक, समीर महाले, चेतन कामत, अजय गडेकर, राजेश सावंत, राहुल गावस, संकेत महाले, साईल महाले, सुरेश वरक, योगेश गोवेकर, गुरुप्रसाद मालकर, लक्ष्मण गावस, जनार्धन वरक, सुमित जाधव, सुवेक गावस, तुकाराम परब यांसह इतर टॅक्सी व्यावसायिकांचा समावेश आहे.

या कारवाईमुळे गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. विजय सरदेसाई यांनी यापूर्वीच सरकारवर 'सूडबुद्धीने कारवाई' करत असल्याचा आरोप केला आहे. टॅक्सी चालकांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे. दुसरीकडे, १५ जून रोजी होणाऱ्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५४ जणांना एकाच वेळी पाचारण केल्याने पेडणे पोलीस स्थानक परिसरात त्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे जीएमआर कंपनी आणि स्थानिक टॅक्सी चालक यांच्यातील वाद आता न्यायालयीन आणि पोलीस चौकशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

SCROLL FOR NEXT