Mopa Airport Taxi Driver Protest: ‘मोपा’वर टॅक्सी स्टॅंडसाठी आंदोलन अद्याप सुरूच

आंदोलकांचा आक्रमक पवित्रा: वाहतूकमंत्री, आमदारांना निवेदन सादर
Mopa Airport Taxi Driver Protest
Mopa Airport Taxi Driver ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport Taxi Driver Protest: ग्रीन फील्ड मोपा टॅक्सी असोसिएशन आणि मोपा एअरपोर्ट लोकल टॅक्सी ऑपरेटर असोसिएशनतर्फे पेडणे येथे सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच होते.

आज वाहतूकमंत्री, पेडण्याचे आमदार, मामलेदार यांना निवेदने सादर करून मोपा विमानतळावर त्वरित पिवळ्या-काळ्या टॅक्सी स्टँडसाठी अधिसूचना जारी करण्याची मागणी केली.

Mopa Airport Taxi Driver Protest
ST Reservation: राजकीय आरक्षणासाठी जनआंदोलन

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पिवळ्या-काळ्या टॅक्सी स्टँडचे वाटप करण्याचे दिलेले आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन सुरू केले आहे.

त्यात विमानतळावर पिवळ्या-काळ्या टॅक्सी स्टँडसाठी अधिसूचना जारी करणे, 75 ते 100 टॅक्सी सामावून घेण्यासाठी जागेची तरतूद असावी, मोपा टॅक्सी स्थानकावर टॅक्सी परवान्यासाठी ज्या टॅक्सीधारकांनी पेडणे वाहतूक कार्यालयात 1342 अर्ज केले आहेत, त्या सगळ्यांना परवाने देण्यात यावेत.

Mopa Airport Taxi Driver Protest
Sudin Dhavalikar: मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान योग्यच..

टॅक्सी परवाने देताना विमानतळासाठी जमीन गेलेल्या पंचायतींना प्राधान्य द्यावे तसेच अल्पवयीन मुले असलेल्या विधवांसाठी विशेष आरक्षण ठेवणे. टॅक्सी धारकांना कमीत कमी रक्कम आकारण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश असून 6 मेपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर ग्रीन फील्ड मोपा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष उदय महाले व मोपा एअरपोर्ट लोकल टॅक्सी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुवेक गावस यांच्या सह्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com