GMR Mopa Airport Taxi Charges Issue Dainik Gomatnak
गोवा

Mopa Airport: 2 ते 5 मिनिटांचा नियम जाचक! टॅक्सीचालकांत संताप; मोपा विमानतळावर ‘जीएमआर’च्या नव्या धोरणामुळे गोंधळ

Mopa Airport Taxi Charges Issue: स्थानिक चालकांचे म्हणणे आहे की, ही वेळेची मर्यादा अव्यवहार्य आहे; कारण इतक्या कमी वेळेत गाडीतून साहित्य काढणे व प्रवाशांशी समन्वय साधणे कठीण होते.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : मोपा विमानतळावरील ‘जीएमआर’च्या नवीन नियमांमुळे सर्व टॅक्सीचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या नियमांनुसार, पिकअप व ड्रॉप झोनमध्ये २ ते ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांकडून २१० रुपये शुल्क आकारले जात आहे.

या स्थानिक चालकांचे म्हणणे आहे की, ही वेळेची मर्यादा अव्यवहार्य आहे; कारण इतक्या कमी वेळेत गाडीतून साहित्य काढणे व प्रवाशांशी समन्वय साधणे कठीण होते. या हुकूमशाही निर्णयाच्या निषेधार्थ, बुधवारी (७ जानेवारी) मोठ्या संख्येने टॅक्सीचालक कोलवाळ येथे हाउसिंग बोर्ड परिसरात जमले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात १२ सदस्यांचे एक शिष्टमंडळ जीएमआर अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मोपा विमानतळावर गेले होते.

याविषयी माध्यमांकडे बोलताना टॅक्सीचालक चेतन कामत म्हणाले की, मोपा विमानतळावर जीएमआर कंपनीने मनमानी कारभार चालवला आहे. याठिकाणी पिकअप व ड्रॉपसाठी येणाऱ्या वाहनांकडून दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास २१० रुपये शुल्क आकारले जाते. हा टॅक्सीचालकांवर आर्थिक भुर्दंड आहे. आमचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. जीएमआर कंपनीने हा निर्णय मागे घ्यावा तसेच येथील बसविलेले गतिरोधक हटविण्यात यावेत. तसेच टोल पॉइंटदेखील काढावा.

आमचा हा लढा सुरूच राहील!

मोपा जीएमआर कंपनी सध्या ‘सरकारी जावई’ झाली आहे. विमानतळस्थळी जीएमआरने गाडीतून साहित्य काढण्यासाठी स्वतःचे कर्मचारी नेमावेत, जेणेकरून त्यांना वस्तुस्थिती समजेल. जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील, असेही चेतन कामत म्हणाले.

यावेळी मोठ्या संख्येने टॅक्सीचालक कोलवाळ परिसरात जमले होते. त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT