Mollem check post workers unpaid salary Dainik Gomantak
गोवा

Mollem: चार महिन्यांपासून कामगारांचा पगार थकीत, मोले चेक नाक्यावरील 18 जणांवर उपासमारीची वेळ; पंचायत मंडळाची मध्यस्थी

Mollem check post workers unpaid salary: मोले येथील स्कॅनर चेक नाक्यावर कार्यरत असलेल्या १८ कंत्राटी कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: मोले येथील स्कॅनर चेक नाक्यावर कार्यरत असलेल्या १८ कंत्राटी कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. तसेच त्यांना नियुक्तीपत्रेही देण्यात आलेली नाहीत. याबाबत या कामगारांनी आपली कैफियत पंचायत मंडळाकडे मांडल्यानंतर पंचायत मंडळाने कंत्राटदाराला याबाबत जाब विचारला. दरम्यान, येत्या आठवडाभरात सर्व देणी पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले आहे.

पंच सुहास गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोले चेक नाक्यावर स्कॅनिंग व इतर तांत्रिक कामांसाठी १८ स्थानिक कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदार अजय यादव यांनी या कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन दिलेले नाही.

पगारासोबतच कामावर रुजू झाल्यापासून नियमानुसार मिळणारी नियुक्तीपत्रेही अद्याप देण्यात आलेली नसल्याने कामगारांमध्ये नोकरीच्या सुरक्षेबाबत भीती निर्माण झाली होती.

वारंवार मागणी करूनही कंत्राटदाराकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर कामगारांनी मोले पंचायत मंडळाकडे आपली कैफियत मांडली. कामगारांची ही समस्या लक्षात घेऊन सरपंच विठोबा मळेकर व पंच सदस्यांनी कंत्राटदार यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी सरपंच विठोबा मळेकर, पंच सुहास गावकर, कपिल नाईक, वामन गावकर, जनी दामेकर, उपसरपंच प्रणाली वेरेकर व इतर पंच उपस्थित होते.

कंत्राटदाराचे आश्वासन

कंत्राटदार यादव यांनी यावेळी आपली बाजू मांडली. काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात सर्व कामगारांचा थकीत पगार दिला जाईल, तसेच त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे सुपूर्द केली जातील, असे आश्वासन दिले.

मुदतीत पगार मिळाला नाही, तर पंचायत पुढील पावले उचलेल, असे सरपंच विठोबा मळेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT