Vasco News  Dainik Gomantak
गोवा

Vasco: विकास कामांचा आमदार कृष्णा साळकरांनी घेतला आढावा

कामाकाजाबाबत अधिकाऱ्यांना ही दिल्या सुचना

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोतील बंदर आणि शहराला जोडणाऱ्या पुल बांधकामांचा कामाचा आढावा आज आमदार कृष्णा साळकर यांनी आढावा घेतला. मुरगाव बंदर प्राधिकरणाने आज बैठक बोलावली होती. यावेळी कामकाजास होत असलेला विलंब कामाचा दर्जा आणि याबाबतची सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. यावेळी या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार साळकर यांनी दिल्या आहेत.

(MLa Krishna Salkar reviewed the development works in vasco city)

या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी सुरुवातीला सल्लागाराने पूर्ण झालेल्या कामाचे सादरीकरण केले आणि प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा रोड मॅप सादर केला. यावेळी आमदार साळकर यांनी या प्रकल्पाला विलंब का होत आहे ? याची माहिती जाणून घेतली अधिका-यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे काम मंदावले होते. आणि वैलंकणी चॅपलजवळील आरओबीसाठीचे साहित्य परदेशातून आणावे लागते. त्यासाठी कामाची गती मंदावली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वास्कोचे आमदार साळकर यांनी या प्रकल्पाला विलंब का होत आहे, याची माहिती घेतली व जड वाहतूक वळवून शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. अवजड वाहतुकीमुळे वास्को व मुरगाव येथील सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसर गैरसोय होत असल्याने, या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिल्या.

यावर अधिकाऱ्यांनी मार्च 2023 पूर्वी उर्वरित कामे पूर्ण होणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्यासह एम पी ए चे अध्यक्ष व्यंकट रमणा अक्काराजू, गमन इंडियाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT