High Court Decision  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता प्रकरण; काँग्रेस नेत्याची हायकोर्टातील याचिका निकाली

Girish Chodankar Petition: गुरुवारी उच्च न्यायालयाने गिरीश चोडणकर यांची याचिका निकाली काढली

Akshata Chhatre

पणजी: वर्ष २०२२ मध्ये गोवा काँग्रेस पक्षातील आठ आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या पक्ष बदलानंतर गिरीश चोडणकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर पक्ष बदलेल्या आठ आमदारांना कायमचे अपात्र ठरवण्याची मागणी केली होती, मात्र यानंतर त्यांनी तवडकरांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुरुवारी उच्च न्यायालयाने गिरीश चोडणकर यांची याचिका निकाली काढली.

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी करत गिरीश चोडणकर थेट सर्वोच्य न्यायालयात दाखल झाले होते, मात्र कलम १३६ नुसार सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी सुनावणी करू शकत नसल्याने सर्वोच्य न्यायालयाने कलम २२६ नुसार त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि सभापतींच्या आदेशाविरोधात घटनेच्या कलम १३६ अंतर्गत गिरीश चोडणकर यांनी याचिका दाखल केली होती.

गुरुवार (१६ जानेवारी) रोजी समोर आलेल्या निकालानुसार उच्च न्यायालायने गिरीश चोडणकरांची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, यापूर्वी झालेल्या न्यायालयीन सुनावणीमध्येच हा मुद्दा पूर्ण झाला आहे, तसेच याचिकेत कुठलाही नवीन मुद्दा नाही, असे सांगत कोर्टाने याचिका निकाली काढली.

२०२२च्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेस पक्षामधून दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक आणि राजेश फळदेसाई अशा आठ आमदारांनी एका वेगळ्या गटाची स्थापना करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

SCROLL FOR NEXT