MLA Disqualification Petition: सर्वोच्च न्यायालयाचा गोवा काँग्रेसला झटका; आमदार अपात्रता याचिका फेटाळली

Goa MLA Disqualification Petition: सभापती रमेश तवडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची काँग्रेसची याचिका ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी फेटाळली होती.
MLA Disqualification Petition: सर्वोच्च न्यायालयाचा गोवा काँग्रेसला झटका; आमदार अपात्रता याचिका फेटाळली
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Goa MLA Disqualification Petition

पणजी: काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळण्याच्या गोवा विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) फेटाळली.

मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांना या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्यास सांगितले आहे.

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची काँग्रेसची याचिका ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी फेटाळली होती. ही अपात्रता याचिका काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केली होती.

MLA Disqualification Petition: सर्वोच्च न्यायालयाचा गोवा काँग्रेसला झटका; आमदार अपात्रता याचिका फेटाळली
Goa Drug Case: सनबर्न, थर्टी फर्स्टपूर्वी गोवा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 10 लाखांचा गांजा जप्त

दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, रुडॉल्फ फर्नांडिस आणि राजेश फळदेसाई यांना अपात्र ठरविण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

MLA Disqualification Petition: सर्वोच्च न्यायालयाचा गोवा काँग्रेसला झटका; आमदार अपात्रता याचिका फेटाळली
चौकीदार चोर है! आरोपी सुलेमान फरार होणे ही CM सावंत यांची PM मोदींना मानवंदना; काँग्रेसची टीका

दरम्यान, "निवडून आलेल्या आमदाराचा मूळ राजकीय पक्ष इतर कोणत्याही राजकीय पक्षात विलीन झाल्यास, सदस्य अपात्र होणार नाही. मग तो विलीनीकरणासोबत असो वा असहमत असो. विलीनीकरणाच्या बाबतीत अपात्रतेचे नियम लागू होणार नाहीत, असा निर्णय सभापती रमेश तवडकर यांनी चोडणकर यांची याचिका फेटाळून लावताना दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Supreme Court Stray Dog Directions
Goa High Court Coastal Encroachment
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Goa High Court Shivaji Maharaj statue
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com