Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

‘मंत्री सुदिन ढवळीकरांनी दीपस्तंभासम कार्य करावे’

मिळालेल्या खात्याचा वापर गोमंतकीय जनतेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी करावा: दिवाकर शिंक्रे

दैनिक गोमन्तक

बोरी: वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्यांना कार्यतत्परतेने मिळालेल्या खात्याचा वापर गोमंतकीय जनतेच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी करावा. वीजखाते हे महत्त्वाचे खाते गोव्यात दीपस्तंभासारखे आहे. त्याद्वारे राज्याला प्रगतीचा प्रकाश देऊन अंधकार दूर करावा, आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे प्रतिपादन कपिलेश्वरीच्या श्री कपिलेश्‍वर सेवामंडळचे अध्यक्ष दिवाकर शिंक्रे यांनी केले.

रविवार 17 रोजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महालक्ष्मी बांदोडा येथील मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी दिलीप कपिलेश्‍वरकर, संदीप रायकर, हरिप्रसाद कपिलेश्‍वरकर, प्रमोद कुर्डीकर, लक्ष्मीकांत कपिलेश्‍वरकर, देविदास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री ढवळीकर म्हणाले, की मडकई मतदारसंघाबरोबरच राज्याचा चौफेर विकास करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. गरीब दुबळ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या समस्या दूर करणे हे माझे मी कर्तव्य समजतो. कपिलेश्‍वर सेवा समितीने माझा गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हरिप्रसाद कपिलेश्‍वरकर यांनी स्वागत केले.दिलीप कपिलेश्‍वरकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT