River Information System Dainik Gomantak
गोवा

Goa: धक्कादायक माहिती! नदी माहिती प्रणाली बसवण्यासाठी चालढकल; जलमार्ग प्राधिकरणाकडून मिळणारा निधी घेण्यास टाळाटाळ

River Information System Goa: प्रणाली बसवण्यासाठी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडून निधी मिळणार असूनही तो घेतला जात नसल्याची माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

River Information System Update

पणजी: खाणी सुरू झाल्यावर नदीतून बार्जची वाहतूक वाढेल, असे असले तरी ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेली नदी माहिती प्रणाली बसवण्यासाठी बंदर कप्तान खात्याकडून चालढकल सुरू आहे. राज्यातील सहा नद्या या राष्ट्रीय जलमार्ग ठरवल्याने ही प्रणाली बसवण्यासाठी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडून निधी मिळणार असूनही तो घेतला जात नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

राज्यातील जलमार्गांचा वापर जास्तीत जास्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. हे जलमार्ग यांत्रिक नौकांसाठी वापरण्यायोग्य करण्यात येत आहेत. सागरमाला प्रकल्पांतर्गत धक्के बांधण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

अंतर्देशीय जलवाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी आणि त्यातील अडचणी दूर करण्यासाठी या प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. या प्रणालीच्या मदतीने जलवाहतुकीतील सुरक्षा, कार्यक्षमता आणि पर्यावरणीय संरक्षण सुनिश्चित करता येते, ज्यामुळे अंतर्देशीय जलमार्गांचा अधिक प्रभावी आणि व्यापक वापर शक्य होणार आहे. बार्ज वाहतूक वाढल्यावर या प्रणालीची गरज प्रकर्षाने जाणवणार आहे.

नदी माहिती प्रणाली म्हणजे काय?

नदी माहिती प्रणाली ही एक आधुनिक तांत्रिक प्रणाली आहे जी अंतर्देशीय जलमार्गांवरील जलवाहतुकीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुलभ करते. ही प्रणाली जलवाहतुकीतील सुरक्षा, कार्यक्षमता आणि पर्यावरणीय संरक्षण वाढवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. RIS मध्ये रडार, ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम , इलेक्ट्रॉनिक चार्ट डिस्प्ले आणि इन्फर्मेशन सिस्टम यांसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश असतो, ज्याद्वारे जलवाहतूक नियंत्रण केंद्रांना वास्तव वेळेत जहाजांची माहिती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT