exlelant service 
गोवा

सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल गोव्यातील चार कर्मचाऱ्यांना सेवा पदके

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार पदकांचे वितरण

दैनिक गोमन्तक

पणजी: स्वांतत्र्यदिनानिमित्त गोव्यातील पोलिस व अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक तसेच गृहरक्षक व नागरी संरक्षण विभागातील दोन मिळून एकूण चार अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठी आज पदके जाहीर झाली. गृहरक्षक व नागरी संरक्षण विभागाच्या सेकंड इन कमांडंट कॅरोलिना फर्नांडिस यांना राष्ट्रपती सेवा पदक देण्यात आले आहे.

(Medail to four officers for exlelant service from Goa Government)

गेली दोन वर्षे स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी सर्वोत्कृष्ट सेवेसाठी जाहीर झालेल्या पोलिस, अग्निशमन दल व गृहरक्षक व नागरी सरंक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना उद्या, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सेवा पदकाने सन्मानित केले जाणार आहे.

यांचा होणार सन्मान

गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीमध्ये कोलवा वाहतूक पोलिस निरीक्षक विजननाथ कवळेकर यांना पोलिस सेवा पदक, अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रशांत धारगळकर यांना अग्निशमन सेवा पदक तर नारायण पागी यांना गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवा पदक देण्यात आले आहेत. तर सेकंड इन कमांडंट कॅरोलिना फर्नांडिस यांचाही या यादीत समावेश आहे.

'हर घर तिरंगा मोहिमे' अंतर्गत पणजीतील मांडवी नदीवर तिरंगा बोट रॅली

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त "हरघर तिरंगा मोहिमेचा" भाग म्हणून पणजीतील मांडवी नदीवर तिरंगा बोट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय दळणवळण विभाग गोवा, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी तिरंगा बोट रॅलीचे आयोजन केले होते, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, 75 तिरंगा असलेले 75 लोक मांडवी नदीतून 75 मिनिटे हर घर तिरंगा ब्रँडिंगने सजवलेल्या क्रूझवर प्रवास केला. यादरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT