IIT Goa: सांगेतील ‘आयआयटी’ जमीन सर्वेक्षणाचे काम पूर्ण- सुभाष फळदेसाई

Goa IIT
Goa IITDainik Gomantak

राज्य सरकारकडून सांगेत होऊ घातलेल्या ‘आयआयटी’चे जमीन सर्वेक्षण काम पूर्ण झाले आहे. (land survey for iit goa campus done) आयआयटी या जागेला लवकरच भेट देईल, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई (subhash phaldesai) यांनी दिली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पोलिस बंदोबस्तात जमीन सर्वेक्षणाला सुरूवात झाली. स्थानिकांनी ‘आयआयटी’ला विरोध दर्शवला होता. त्यानंतर अखेर राज्य सरकारकडून ‘आयआयटी’चे जमीन सर्वेक्षण काम पूर्ण झाले आहे.

Goa IIT
सांताक्रुझमध्ये कचरा शेडचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू

केंद्रिय शिष्टमंडळ नियोजित जागेला भेट देऊन जागेची पाहणी करेल, त्यानंतर राज्य सरकार आयआयटी स्थापनेसाठी जागा सुपूर्द करेल. आयआयटीला कायमस्वरूपी जागा मिळेल. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. तसेच, सुभाष फळदेसाई म्हणाले की, साडेसात लाख चौरस मीटर जागेची मालकी आता राज्य सरकारकडे असेल. येथे कोणतेही घुसखोरी अतिक्रमण म्हणून ग्राह्य धरली जाईल.

दरम्यान, मागील महिन्यात आयआयटी विरोधक आणि समर्थक असे दोन गट पहायला मिळाले होते. पर्यावरणवाद्यांनी देखील या वादात उडी घेतली होती. तर, आयआयटी समर्थकांनी नेहमीच आयआयटीच्या बाजूने आवाज उठवला.

Goa IIT
रवी नाईक, सुदिन ढवळीकरांकडून भाऊसाहेब बांदोडकरांना आदरांजली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com