Mayem Mangrove Destruction Dainik Gomantak
गोवा

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Mayem Mangrove Destruction Complaint: मयडे नदीच्या तीरावर आणि गावातील सर्व्हे क्रमांक ३३/१ मध्ये मोठ्या प्रमाणावर खारफुटींची (मँग्रोव्हज) तोड करण्यात आल्याचा आरोप करत ‘गोवा ग्रीन ब्रिगेड’ने वन खाते.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: मयडे नदीच्या तीरावर आणि गावातील सर्व्हे क्रमांक ३३/१ मध्ये मोठ्या प्रमाणावर खारफुटींची (मँग्रोव्हज) तोड करण्यात आल्याचा आरोप करत ‘गोवा ग्रीन ब्रिगेड’ने वन खाते, गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि पर्यावरण व हवामान बदल खात्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीत संस्थेचे निमंत्रक आवर्तियानो मिरांडा यांनी सांगितले की, १२ जून रोजी ‘जीसीझेडएमए’ने पाहणी करून चार महिन्यांहून अधिक काळ लोटला असला, तरी झालेल्या नुकसानीचे किंवा खारफुटी विनाशाचे कोणतेही मूल्यमापन अद्याप झालेले नाही. तसेच संबंधित यंत्रणांनी दोषींवर ठोस कारवाई न केल्यामुळे येथील सागरी परिसंस्था, जैवविविधता आणि माशांच्या प्रजननाच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

मयडे येथील जुनी खारफुटी नदीच्या किनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच सागरी जीवांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, या बेसुमार कत्तलीमुळे मोठा नैसर्गिक तोटा झाला आहे. एवढेच नव्हे तर नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने मयडे नदीतील मगरी कोलवाळ आणि आसपासच्या निवासी भागांत घुसण्याच्या घटना वाढल्या असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची गंभीर चिंताही तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.

दोषींवर गुन्हे नोंदवावेत!

या पार्श्वभूमीवर, पर्यावरण विनाशाला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने फौजदारी आणि दंडात्मक गुन्हे नोंदवावेत, सागरी नुकसानीचा अभ्यास करून खारफुटींचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच या पुनरुज्जीवनाचा संपूर्ण खर्च सरकारी तिजोरीतून न करता दोषींकडूनच वसूल करण्यात यावा, असा आग्रह धरण्यात आला आहे. संबंधित खात्यांनी पुढील ३० दिवसांत केलेल्या कारवाईचा अहवाल द्यावा, अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावण्यात येतील, असा थेट इशारा ‘गोवा ग्रीन ब्रिगेड’ने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

Cooking Oil Recycling: हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या वापरलेल्या तेलाची डिजिटल नोंद होणार? गोवा सरकारला 18 महिन्यांचा आराखडा; प्रस्तावित नियम काय?

Supreme Court: 'धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नेमंक प्रकरण काय?

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT