Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao: ‘चिप्स’च्या पॅकेटवरून पेटला वाद! 10वीच्या विद्यार्थ्याला जबर मारहाण; 12वीच्या 4 विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

Margao student assault: एका हायस्कूलजवळ मडगावात शनिवारी (ता.८) बारावीच्या विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्याचा प्रकार घडला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एका हायस्कूलजवळ मडगावात शनिवारी (ता.८) बारावीच्या विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्याचा प्रकार घडला. या मारहाणीत दहावीच्या विद्यार्थ्याच्या नाकाला गंभीर दुखपात झाल्याने याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी मारहाणीत गुंतलेल्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते.

शुक्रवारी ‘चिप्स’च्या एका पॅकेटवरून दहावीचा विद्यार्थी व बारावीचा विद्यार्थी यांच्यादरम्यान शाब्दीक वाद निर्माण झाला होता. नंतर हे प्रकरण आपसांत मिटवले गेले होते. मात्र, शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने दहावीच्या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली.

त्यात त्याच्या नाकाला जबरदस्त मार लागला. याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण केलेल्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत ते पोलिस स्थानकात होते. येथे यापूर्वीही विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला होता. त्यामुळे येणे पोलिस तैनात करावेत अशी मागणी पालकांनी केली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचा एक गट दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करीत असताना या हायस्कूलचे शिक्षक हाताची घडी घालून हा प्रकार पाहत होते. यावेळी हाणामारी सोडवण्यासाठी एक शिक्षक पुढे सरसावला असता, त्याला अन्य शिक्षकांनी बाजूला केले. शिक्षकांच्या या बेजबाबदार कृतीबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2026 Lucky Zodiac Sign: शुक्र-बुधाची जादू तर सूर्य-मंगळाचा धडाका! जानेवारी महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; 2026 ची सुरुवात ठरणार सुवर्णकाळ

गोव्यात नाताळचा उत्साह! मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून शांतता व एकात्मतेचा संदेश; आर्चबिशपांनी केली शांततेची प्रार्थना

कलंगुट पोलिसांची मोठी कारवाई! साडेचार लाखांच्या ड्रग्जसह हळदोणचा तरुण गजाआड; ख्रिसमसच्या तोंडावर तस्करांचे धाबे दणाणले

Goa Politics: 'त्याचा' फटका विधानसभेत बसणार नाही! मतांच्या टक्केवारीतून जनतेने भाजपलाच कौल दिला; दामू नाईक

आयपीएल 2026 पूर्वी आरसीबीचं वाढलं टेन्शन, लैंगिक अत्याचारप्रकरणी स्टार गोलंदाजाला कोर्टाचा दणका; कोणत्याही क्षणी अटक?

SCROLL FOR NEXT