Margao : वाणिज्य व अर्थशास्त्र सरकारी महाविद्यालय, बोर्डा, मडगाव येथे वेटलिफ्टिंग या विषयावरील परिसंवाद व कार्यशाळा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीविषयी जागृती निर्माण करून विद्यार्थ्यांची खेळाविषयी अभिरूची वाढविणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.
गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, हरमल-गोवा येथील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा महाविद्यालयाचे संचालक लेफ्टनंट (डॉ.) अनिकेत केरकर हे या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक होते. प्राचार्य, प्रा. (डॉ.) एफ. एम. नदाफ यांनी स्वागत केले. प्रा.अरॉन परेरा (संचालक, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग, बोर्डा महाविद्यालय यांनी मुख्य मार्गदर्शक लेफ्टनंट (डॉ.) अनिकेत केरकर यांची ओळख करून दिली. वाणिज्य विभागाच्या साहाय्यक प्रा. फराह मेंडोन्का यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यशाळेत प्राचार्य नदाफ स्वागतपर भाषणात म्हणाले, खेळांमुळे विद्यार्थ्यांची भरभराट होते. समाज व देश याविषयी आत्मीयता वाढून जबाबदार नागरिक बनण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. पुढे ते म्हणाले की, सरकारी महाविद्यालय, बोर्डा-मडगाव ही राज्यातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे, जी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांसह सक्षम करते. शिवाय शैक्षणिक उत्कृष्टता प्रदान करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते, असेही यावेळी नदाफ म्हणाले.
लेफ्टनंट (डॉ.) अनिकेत केरकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन
लेफ्टनंट (डॉ.) अनिकेत केरकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी आत्मीयता आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी उपयुक्त मूल्यवान घटक सांगितले. केरकर यांनी फिटनेस आणि पॉवरलिफ्टिंग, क्रीडा तंत्र, प्रशिक्षण पद्धती आणि आहारविषयक शिफारशी यासारख्या तांत्रिक बाबींचा अभ्यासपूर्वक आढावा घेत अमूल्य माहिती दिली.
यावेळी लेफ्टनंट (डॉ.) अनिकेत केरकर यांनी मंचावर वेटलिफ्टिंगशी संबंधित शारीरिक क्रियाकलाप आणि व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखवले. वेटलिफ्टिंगचे धडे : या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंगच्या व्यावहारिक प्रशिक्षणात सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे त्यांची खेळाची समज वाढली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.