Margao Municipality : मडगाव पालिकेच्या कर्मचारी विभागांत बदल

एखादा कर्मचारी रजेवर गेल्‍यास त्‍या जागी अन्‍य कर्मचाऱ्याने काम पाहण्‍याची व्यवस्था
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipality : मडगाव पालिकेच्‍या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्‍यासाठी नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी कर्मचाऱ्यांना बढती दिल्‍यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या विविध विभागात फेरबदल केले आहेत.

पालिकेने महिन्‍याभरापूर्वी ३४ कर्मचाऱ्यांना बढत्‍या दिल्‍य. त्‍यात दोन मार्केट निरीक्षक, वरिष्‍ठ कारकून, कनिष्‍ठ कारकून आणि अन्‍य पदांचा समावेश आहे.

या बढत्‍या दिल्‍यानंतर पालिकेच्‍या तांत्रिक, प्रशासकीय, कर आदी विभागांमध्‍ये त्‍यानुसार फेरबदल करणे क्रमप्राप्‍त होते. त्‍याचबरोबर अन्‍य बदलही करण्‍यात आले आहेत.

Margao Municipality
Goa Assembly Monsoon Session 2023 : बोगस कॉल सेंटर्समुळे राज्याच्या प्रतिमेला धक्का; कायदा, सुव्यवस्था ढासळली

बढत्‍या देताना आपण कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे जनतेची कामे करण्‍याचे निर्देश दिले होते. फेरबदल करताना कर्मचाऱ्यांचे त्‍या जागेवर काम करण्‍यासंदर्भात मत जाणून घेतले व त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर जबाबदारी सोपविण्‍यात आली.

प्रशासकीय फेरबदल करताना आपण एखादा कर्मचारी रजेवर गेल्‍यास त्‍या जागी अन्‍य कर्मचाऱ्याने काम पाहण्‍याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती नगराध्‍यक्ष शिरोडकर यांनी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
drunk beggars creating nuisance in Margao
 Margao Jewelers Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com