Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao: मडगाव प्रभाग फेरबदल वादात, सुनावणीत त्रुटी उघड; मतदार विभाजनावर प्रश्नचिन्ह

Margao ward delimitation dispute: मडगाव नगरपालिका प्रभाग पुनर्रचनेतील सूचना व हरकती सादर करण्याचा काल अंतिम दिवस होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: मडगाव नगरपालिका प्रभाग पुनर्रचनेतील सूचना व हरकती सादर करण्याचा काल अंतिम दिवस होता. ज्यांनी पुनर्रचना संदर्भात सूचना व हरकती सादर केल्या, त्यावर आज दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी गणेश बर्वे यांच्यापुढे सुनावणी पूर्ण झाली.

मतदार नोंदणी अधिकारी बर्वे यांनी सर्व उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेतले व नोंद करून घेतले. आता ते आपला अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील.

काँग्रेसचे नेते सावियो कुतिन्हो म्हणाले, प्रभाग पुनर्रचनेत अनेक त्रुटी आहेत. ज्या पद्धतीने ही पुनर्रचना करण्यात आली आहे ते पाहता नगरपालिका निवडणुका सुद्धा रद्द करण्याचा सरकारचा डाव दिसतो. ज्या अर्थी निवडणूक न घेता काही नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे.

गोवा फॉरवर्डचे नगरसेवक लिंडन परेरा, फ्रांसिस जोन्स, निमिशा कुलासो, राजू नाईक यांनी सुद्धा हरकती सादर केल्या आहेत व ते सर्व सुनावणीस उपस्थित होते.

भौगोलिक दृष्ट्या प्रभागांची पुनर्रचना चुकीची करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. राजू नाईक म्हणाले, आता आपला प्रभाग ११ झाला असला तरी त्यातील ३४ व्या भागातील ५६० मतदारां पैकी २४४ मतदार प्रभाग १० मध्ये समाविष्ट केले आहे जे भौगोलिक दृष्ट्या प्रमाणीत नाही. लिंडन परेरा, फ्रांसीस जोन्स यांनी आपल्या प्रभागांबद्दल हीच भावना व्यक्त केली.

निमीशा कुलासो म्हणाल्या, आपला‌ २३ प्रभाग रद्दच करून टाकला आहे. या प्रभागातील दोन भाग १ व दोन भाग प्रभाग १२ मध्ये समाविष्ट केले आहेत. हा प्रभाग पुनर्प्रस्थापित करण्याची मागणी आपण केली आहे. या सुनावणीला वकील स्नेहल ओंसकर व माजी नगरसेवक जाफर मोहंमद हे सुद्धा उपस्थित होते.

मडगावात वाद पेटला

मडगाव प्रभाग पुनर्रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती

उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण

काँग्रेसचा आरोप, निवडणुका टाळण्याचा डाव

गोवा फॉरवर्ड नगरसेवकांचाही विरोध

भौगोलिक विसंगती व मतदार विभाजनावर प्रश्नचिन्ह

काही प्रभाग रद्द, काहींचे तुकडे करून समावेश

अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT