डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Bicholim Old Market Power Lines: व्यापाऱ्यांच्या तक्रारीनुसार वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२६) बाजारात येऊन जीर्ण वीजखांब आणि वीजवाहिन्यांची पाहणी केली.
 Bicholim Old Market Power Lines
Bicholim Electric PolesDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीत जुन्या बाजारातील जीर्ण झालेल्या वीजखांबांसह वीजवाहिन्या धोकादायक बनल्या असून, संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी बाजारातील व्यापाऱ्यांनी केली आहे. जुनाट वीजवाहिन्यांमुळे ओम प्रसाद बेकरीसमोरील गल्लीतील काही दुकानांत अधूनमधून ‘स्पार्क’चे झटके बसत आहेत.

पावसावेळी तर प्रकर्षाने हा अनुभव येत आहे, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे. व्यापारी तसेच बाजारहाटीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करून बाजारातील वीजव्यवस्थेत सुधारणा करावी, बाजारात भूमिगत वीजकेबल टाकावेत, अशी मागणी बाजारातील व्यापारीवर्गाने केली आहे.

 Bicholim Old Market Power Lines
Bastora Fire Incident: मुले शाळेत, आई-वडील कामावर अन् मागे सगळंच संपलं! सोन्याचे दागिने, कपडे अन् अन्नधान्य जळून खाक; दुर्घटनेत कुटुंबाचे नुकसान

दरम्यान, व्यापाऱ्यांच्या तक्रारीनुसार वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२६) बाजारात येऊन जीर्ण वीजखांब आणि वीजवाहिन्यांची पाहणी केली. व्यापाऱ्यांकडून वीज समस्येविषयी माहितीही जाणून घेतली. बाजारात जे वीजखांब घालण्यात आले आहेत. ते साधारण पन्नास वर्षांपूर्वीचे आहेत. हे खांब जीर्ण झाले असून, वीजवाहिन्याही कमकुवत झाल्या आहेत.

बहुतेक वीजखांबांवर तर वीजजोडण्यांची गर्दी झाली असून, वीजवाहिन्या लोंबकळत असल्याचे दिसून येत आहे. वीजखांब किंवा वीजवाहिन्या बदलण्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याने बाजारात सध्या भयानक समस्या निर्माण झाली आहे.

 Bicholim Old Market Power Lines
Goa Nightclub Fire: हडफडे नाईटक्लब प्रकरण; मृतांच्या वारसांना भरपाई देण्यावर भर; मृतांचे वय, रोजगार, नावासह अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश

कमकुवत वीजवाहिन्यांमुळे सध्या बाजारात भयानक समस्या निर्माण झाली आहे. बाजारातील ही भयानक स्थिती पाहता, एखादेवेळी शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन बाजारातील वीजसमस्या सोडवावी, अशी मागणी महेश येंडे, रामा बांदेकर, स्मीत मणेरकर आदी व्यापाऱ्यांनी केली आहे.

शॉर्टसर्किट’मुळे आगीच्या घटना

१९९५ साली शॉर्टसर्किटमुळे बाजारातील एका दुकानाला आग लागली होती. त्यानंतर २०२३ साली त्याच गल्लीतील तीन दुकाने जळून खाक झाली होती. याशिवाय आगीच्या अन्य घटना घडल्या आहेत. सध्या काही दुकानांत अधूनमधून ‘शॉक’चे सौम्य झटके बसत आहेत. शटरला हात लावला, की असे अनुभव येत आहेत. त्यामुळे दुकान उघडताना भीती वाटत आहे, अशी माहिती उल्हास पवार या दुकानदाराने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com