Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

Goa Athletics Championship: माजी संरक्षणमंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात येते.
Goa Athletics Championship
Goa Athletics ChampionshipDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात यंदा ३७वी पश्चिम विभागीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धा रंगणार असून २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत स्पर्धा कुजिरा येथील अटल स्टेडियमवर होईल, अशी माहिती गोवा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

याशिवाय बांबोळी येथील अटल स्टेडियमवर ३० जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत ‘पद्मभूषण डॉ. मनोहर पर्रीकर स्मृती’ ५७वी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा रंगणार असून त्यात राज्यभरातील सुमारे दोन हजार ॲथलीट्स सहभागी होतील असा विश्वासही ॲड. सावईकर यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Goa Athletics Championship
राज्यातील क्रीडा सुविधांचा खासगी संस्था, संघटनांना लाभ! अर्थसंकल्पीय भाषणात निर्णय जाहीर; ‘एकलव्य’ प्रोत्साहन योजना होणार सुरु

माजी संरक्षणमंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात येते. ‘‘मनोहर पर्रीकर यांनी राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात बहुमोल वाटा उचलला आहे. त्यांच्या योगदानास मानवंदना देण्यासाठी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा माजी मुख्यमंत्र्यांच्या नावे घेण्यात येते,’’ असे ॲड. सावईकर यांनी नमूद केले.

या स्पर्धेत आठ वर्षांखालील मुला-मुलींपासून सीनियर पुरुष-महिला गट असतील. स्प्रिंट, मध्य व लांब पल्ल्याच्या शर्यती, अडथळा शर्यती, रिले, उडी स्पर्धा, फेक स्पर्धा, चालण्याची शर्यत यामध्ये चुरस असेल. २५ जूनपासून स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून २३ जुलैपर्यंत प्रवेशिका संघटनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.

Goa Athletics Championship
Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

पश्चिम विभागीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी संघ निवड चाचणी या दृष्टीने राज्यस्तरीय कामगिरीची दखल घेतली जाईल. पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी, तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी सहदेव मांद्रेकर यांच्या अध्यक्षतेखालील गोवा ॲथलेटिक्स असोसिएशनची निवड समिती खेळाडूंची निवड करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

SAFF Women's Championship 2026 Final
SAFF Womens Championship 2026 Final
Goa Green Zone
Goa TCP No Development Zone
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com