Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary: हे अभयारण्य वर्षभर पर्यटकांचे एक लोकप्रिय आकर्षण असले तरी पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary
Bhagwan MahavirDainik Gomantak
Published on
Updated on

हे अभयारण्य वर्षभर पर्यटकांचे एक लोकप्रिय आकर्षण असले तरी पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या काळात या ठिकाणचे धबधबे आपल्या पूर्ण क्षमतेने झेपावत असतात आणि झाडे पावसाळ्यात हिरव्यागार रंगाच्या वस्त्रात नटलेली असतात. निसर्गाचे पूर्ण सौंदर्य इथे अनुभवण्याचा हा काळ असतो.

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले, तब्बल २४० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणारे गोवा राज्यातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जाते. वनस्पती, पक्षी आणि प्राणी जीवनाच्या प्रचंड विविधतेचे हे घर आहे. अभयारण्यात असलेल्या प्रचंड जैवविविधतेव्यतिरिक्त,

Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary
Monsoon Travel Tips: सांगलीचे मिनी महाबळेश्वर! पावसाळ्यात ट्रेकर्ससाठी नंदनवन ठरतंय 'गुढे पाचगणी' पठार; एकदा नक्की भेट द्या

अत्यंत विस्मयकारक नैसर्गिक चमत्कार असणारा दूधसागर धबधबा, नदीच्या प्रवाहाने भक्कम खडकात कोरली गेलेली गूढ दरी- डेव्हिल्स कॅनियन, १२व्या शतकातील एक छोटेसे; पण अतिशय सुंदर, तांबडी सुर्ला मंदिर ही देखील या विस्तृत अभयारण्यातीलच आकर्षक ठिकाणे आहेत. मूलतः ‘मोले गेम सँक्चुअरी’ म्हणून ओळखले जाणारे हे अभयारण्य, १९६९ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

त्यानंतर त्याचे नाव बदलून ‘भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य’ असे ठेवण्यात आले. अभयारण्याचा सुमारे १०७ चौरस किलोमीटरचा गाभा असलेला भाग १९७८ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आला आणि आता तो ‘मोले राष्ट्रीय उद्यान’ म्हणून ओळखला जातो. येथील जंगल इतके दाट आहे की अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही.

Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary
Konkan Monsoon Travel: धुक्याची चादर, पाऊस अन् हिरवाई; पावसाळ्यात कोकणातील 'ही' ठिकाणं नक्की पाहा

वृक्षांव्यतिरिक्त या अभयारण्यात सपुष्प वनस्पतींच्या ७२२ प्रजाती आणि पश्चिम घाट, भारत किंवा भारतीय द्वीपकल्पात स्थानिक असलेल्या वनस्पतींच्या १२८ प्रजाती देखील आढळतात. वनस्पतींव्यतिरिक्त हे अभयारण्य हरीण, सांबर, ठिपकेदार हरीण, डुक्कर, मुंगूस, हरीण आणि भुंकणारे हरीण यांसारख्या अनेक शाकाहारी प्राण्यांच्या प्रजातींचे नैसर्गिक निवासस्थान आहे.

वाघ, बिबट्या, मांजर, पँथर, रानमांजर आणि ताडी मांजर हे येथे राहणारे मांसाहारी प्राणी आहेत. याव्यतिरिक्त जाणकाराला लहान भारतीय सिव्हेट, रानकुत्रा, तरस, अस्वल, कोल्हा, मोठी खार, उडणारी खार, आणि पाणमांजर हे प्राणीदेखील सहज दिसू शकतात. गोव्याचा राज्य पक्षी, माणिक-घसा पिवळा बुलबुल (रूबी थ्रोटेड यलो बुलबुल) हा या अभयारण्यात आढळलेल्या १२० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सर्वांत सामान्य आहे.

Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary
Monsoon Tourism: धुक्याची पांढरी चादर अन् सह्याद्रीचा स्वर्गीय नजराणा; पावसाळी पर्यटनासाठी पुणे-मुंबईजवळच परफेक्ट डेस्टिनेशन 'ताम्हिणी घाट'

पक्षी शौकिनांना गोल्डन ओरिओल, एमराल्ड डव्ह, कॉमन ग्रे हॉर्नबिल, पॅराडाईज फ्लायकॅचर, ग्रेट पाइड हॉर्नबिल, मलबार पाइड हॉर्नबिल, मलबार ट्रोगन, क्रेस्टेड सर्पेंट ईगल, क्रेस्टेड हनी बझार्ड, व्हाइट-रम्पेड स्पाइन टेल, ॲशी वुड स्वॅलो, एशियन पाम स्विफ्ट, जंगल बॅबलर, ऑलिव्ह-बॅक्ड पिपिट, पॉम्पाडोर पिजन, जंगल आउलेट, व्हाइट-बेलीड वुडपेकर, ब्लॅक-क्रेस्टेड बुलबुल, फॉरेस्ट वॅगटेल, स्कार्लेट मिनिव्हेट, चेस्टनट-बेलीड नटहॅच, वेल्वेट-फ्रंटेड इत्यादी पक्षीही तिथे आढळू शकतात.

आपल्या रंगांच्या छटांचे वैभव उधळणारी फुलपाखरेही तिथे विपुल संख्येने आढळतील. ब्लू मॉर्मन, कॉमन जेझेबेल, कॉमन माईम, प्लम जुडी, कॉमन वँडरर, क्रिमसन रोझ, लाईम बटरफ्लाय, प्लेन टायगर, सदर्न बर्डविंग आणि टेल्ड इत्यादी त्याचबरोबर फुलपाखरू अभ्यासकांच्या लक्षात येतील अशा मलबार ट्री निम्फ आणि तमिळ योमन यांसारख्या स्थानिक प्रजातीही येथे आहेत.

Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary
Monsoon Trekking: पावसाळ्यात राजगड ट्रेकचा प्लॅन करताय? निघण्याआधी या 8 गोष्टी नक्की जाणून घ्या!

या अभयारण्यात अनेक प्रकारचे सापही आढळतात. यामध्ये ब्राँझ-बॅक ट्री स्नेक, कॅट स्नेक, हंप-नोज्ड पिट वायपर, इंडियन रॉक पायथॉन, मलबार पिट वायपर, रॅट स्नेक, रसेल्स वायपर, इंडियन कोब्रा आणि कॉमन क्रेट यांचा समावेश आहे. तथापि, तिथला सर्वांत प्रसिद्ध साप निःसंशयपणे किंग कोब्रा आहे.

गोव्याच्या विविध आकर्षणांपैकी एक असलेले हे राष्ट्रीय उद्यान/वन्यजीव अभयारण्य, निसर्ग आणि प्राणीप्रेमी पर्यटकांसाठी निःसंशयपणे एक आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. पावसाळ्यात या जागेला भेट देणे हा एक उत्तम विरंगुळ्याचा उपक्रम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com