Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सावत्र बाप निघाला हैवान; 6 वर्षांच्‍या मुलीला आधी विवस्‍त्र नाचायला लावले, नंतर लैंगिक छळ करून मारहाण

Margaon: रागाच्‍या भरात आपल्‍या सहा वर्षांच्‍या सावत्र मुलीला जबर मारहाण करून तिचा खून केल्‍याच्‍या आरोपाखाली मायणा-कुडतरी पोलिसांनी सलीम डम्‍बल (२८ गदग, कर्नाटक) याला अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: प्‍यायला पाणी देत नाही म्‍हणून रागाच्‍या भरात आपल्‍या सहा वर्षांच्‍या सावत्र मुलीला जबर मारहाण करून तिचा खून केल्‍याच्‍या आरोपाखाली मायणा-कुडतरी पोलिसांनी सलीम डम्‍बल (२८ गदग, कर्नाटक) याला अटक केली असली तरी ही मारहाण करण्‍यापूर्वी या नराधमाने त्‍या अजाण मुलीला विवस्‍त्र करून आपल्‍यासमाेर नाचण्‍यास भाग पाडले आणि नंतर तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचारही केल्याचे उघड झाले आहे. त्‍यामुळे मायणा-कुडतरी पाेलिसांनी या संशयितावर खुनाबरोबर लैंगिक अत्‍याचाराचाही गुन्‍हा नोंद केला आहे.

मयत मुलगी संशयित सलीम याची स्‍वत:ची मुलगी नसून आपल्‍या पतीला साेडून सलीमशी घरोबा केलेल्‍या एका बाईची ती मुलगी असून ती बाई कपडे धुण्‍यासाठी बाहेर गेली असता, संशयिताने त्‍या अजाण मुलीवर लैंगिक अत्‍याचार केल्याचे या मुलीच्‍या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आढळून आले आहे.

या मुलीवर झालेले अत्‍याचार तिने कुणाला सांगू नये यासाठी तिच्‍यावर दहशत माजविण्‍यासाठीच संशयिताने तिला नंतर मारहाण केली असावी व त्यात तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांकडून व्‍यक्‍त केला जात आहे.

मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, त्‍या दुर्दैवी मुलीच्‍या आईने गदग येथे असतानाच आपल्‍या पतीला त्‍यागून सलीमशी घरोबा केला होता. आपल्‍या दोन मुलांना घेऊन ती सलीमकडे रहायला आली होती. सलीमनेही तिला तुझ्‍या दोन्‍ही मुलांना मी माझ्‍या मुलांसारखे वागवेन असे आश्वासन दिले होते.

नंतर तिच्‍या पतीने तिची समजूत काढून परत तिला आपल्‍या घरी घेऊन गेला होता. मात्र, नंतर ती पुन्‍हा आपल्‍या मुलांना घेऊन सलीमकडे रहायला आली होती. सलीमने यापूर्वीही तिच्‍या दाेन्‍ही अल्‍पवयीन मुलांना मारहाण करण्‍याची घटना घडली हाेती, अशी माहिती या प्रकरणात समुपदेशन करणाऱ्या ‘बायलांचो एकवोट’च्या अध्‍यक्ष आवदा व्‍हिएगस यांनी दिली.

‘अभागी मुलांसाठी उपाययोजना व्हावी’

गोव्‍यात अशा परप्रांतीय मुलांवर लैंगिक अत्‍याचाराच्या घटना वाढल्‍या आहेत. यापूर्वीही आपल्‍या पतीला सोडून दुसऱ्यांबरोबर नांदायला आलेल्‍या महिलांच्‍या मुलींवर लैंगिक अत्‍याचार झाल्‍याच्‍या घटना गोव्‍यात नोंद झाल्‍या आहेत. आता त्‍यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. कंत्राटी पद्धतीवर कामाला येणाऱ्या महिलांच्‍या अल्‍पवयीन मुलांवरही यापूर्वी अशाप्रकारचे लैंगिक अत्‍याचार झाल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. अशा अभागी मुलांना संरक्षण देण्‍यासाठी काहीतरी उपाययाेजना आखणे गरजेचे आहे, असे मत व्‍हिएगस यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याची फॉलोऑननंतर ‘जिगर’! अभिनव-मंथनची झुंजार भागीदारी; कर्नाटकविरुद्ध लढत अनिर्णित

Montha Cyclone Update: मोंथा वादळाचा 'शालिमार एक्सप्रेस'ला फटका! गोव्यातून सुटली उशिरा; किनारपट्टीजवळील 120 रेल्वेगाड्या रद्द

Roy Naik: 'आपली तयारी, पण पक्षाचा निर्णय अंतिम'! फोंड्यातील पोटनिवडणुकीबद्दल रॉय नाईकांचे स्पष्टीकरण

Uguem Firing: कोणी केला गोळीबार? उगवे प्रकारणानंतर राज्यात खळबळ, 7 जण ताब्यात; दोन्ही जखमी कामगार बिहारचे

Horoscope: कामात यश, प्रेमात स्थैर्य आणि पैशात वाढ; आजचा दिवस कोणासाठी भाग्यवर्धक?

SCROLL FOR NEXT